शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत गटारी तुडुंब !

By admin | Updated: June 21, 2014 00:53 IST

लातूर : पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने महिनाभरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

लातूर : पावसाच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने महिनाभरापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या चारही भागांतील गटारींचे पाणी कसल्याही परिस्थितीत अडणार नाही, याची काळजी घेत स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाचे पाणी ज्या गल्लीतून, नाल्यांतून मोठ्या नाल्यांना मिळणार आहे, अशाप्रकारच्या गल्लीतील नाल्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होईल की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. लातूर शहरात पावसाळापूर्व कामे हाती घेण्यासंदर्भात महिनाभरापूर्वी आयुक्तांनी स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार गटारी व मोठे नाले मोकळे करण्यासाठी चार जेसीबी यंत्राच्या सहाय्याने महिनाभरापासून काम सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या अजेंड्यावर असलेल्या बहुतांश गटारींचे काम पूर्ण झाल्याचा दावा स्वच्छता निरीक्षकांनी केला आहे. अजूनही काही भागांतील कामे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यंत्राच्या सहाय्याने मोठ्या गटारी काढण्यात आल्या असल्या तरी अंतर्गत गटारी मात्र अजूनही कचरा व मातीने तुंबल्या आहेत. बारमाही स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी गटारीतून पाणी पुढे जावे एवढीच सफाई करतात. त्यामुळे साचलेला कचरा व इतर साहित्य नाल्यांमध्ये तसेच पडून आहे. साळे गल्ली येथील शहावली चौकातील अंतर्गत गटारी भरलेल्या आहेत. तसेच खोरी गल्ली, पाच नंबर चौकानजिक असलेल्या भाग्य नगर, चौधरी नगर, खाडगाव रोडवरील सदाशिव नगर, नांदेड रोडवरील बौद्ध नगर, म्हैसूर कॉलनी, अंजली नगर, सिद्धार्थ सोसायटी, टिळक नगर, हत्ते नगर, शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील मुख्य नाली आदी ठिकाणच्या गटारी तुडूंब आहेत. (प्रतिनिधी)चार जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छता...डी झोनमध्ये भूषण सोसायटी, सिद्धेश्वर नगरमधील मंदिरापर्यंतचा नाला, म्हैसूर कॉलनी, साळे गल्ली ते ताजोद्दीनबाबा, सिद्धेश्वर चौक ते ताजोद्दीनबाबा, रत्नापूर चौक ते सिद्धेश्वर चौक, नांदगाव वेसवरील नाला, पडिले यांच्या शेतातील नाला, मयूरबन सोसायटी, व्यंकटेश नगरातील नाल्यांची स्वच्छता पूर्ण झाली़बी झोनमधील कामे...चार नंबर शाळा ते बौद्ध गार्डन, समता नगरमधील नाला, पशुपतीनाथ नगर ते लमाण तांडा, राजीव गांधी चौक ते शिवाजी चौक, अयोध्या कॉलनी ते रामगिरी नगर, सिद्धेश्वर नगरातील नाला, स्क्रॅप मार्केट ते कोल्हे नगर, इस्लामपुरा, सिद्धेश्वर नगर येथील मोठे नालेही काढण्यात आले आहेत. इस्लामपुरा व सिद्धेश्वर नगरात मोठ्या पोकलेनच्या सहाय्याने गटारी स्वच्छ करण्यात आल्या. ‘सी’ झोनची कामेसम्राट चौक ते कोयना नगर सबस्टेशन, श्रीनगर ते गोरक्षण, महादेव नगरातील मेन रोड, गरुड चौक ते एसओएस बालग्राम, सारोळा रोडवरील नाला स्वच्छ करण्यात आला आहे. शिवाय, अंतर्गत गटारी स्वच्छतेचे काम अजूनही सुरू असल्याचे सांगण्यात आले.