महायुतीतील अंतर्गत प्रवेश बंदी फोल; शिंदेसेना सोडून शिल्पाराणी वाडकर भाजपमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:57 IST2025-11-24T12:56:02+5:302025-11-24T12:57:20+5:30
महायुतीतील अंतर्गत प्रवेश करून घेऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीररीत्या घेतली होती.

महायुतीतील अंतर्गत प्रवेश बंदी फोल; शिंदेसेना सोडून शिल्पाराणी वाडकर भाजपमध्ये दाखल
छत्रपती संभाजीनगर : १८ नोव्हेंबर रोजी अचानक शिंदेसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाराणी वाडकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
महायुतीतील अंतर्गत प्रवेश करून घेऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीररीत्या घेतली होती. या पार्श्वभूमीवर वाडकर यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले होते. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फोल ठरविल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील पदाधिकारी, नेत्यांचे परस्परांच्या पक्षांत प्रवेश करून घेऊ नये, अशी मागणी शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शिवाय, पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही शिल्पाराणी वाडकर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे सांगितले होते. मात्र, रविवारी वाडकर यांना भाजपच्या शहर जिल्हा कार्यालयात प्रवेश देण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह पक्षाच्या महिला आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.