शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या ३० नमुन्यांची तपासणी

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

हिंगोली : खरीप हंगामात पेरल्या जाणार्‍या बियाण्यांतील ३० नमुने कृषी विभागाने तपासले असून त्यात २० नमुने सोयाबीनचे आहेत.

 हिंगोली : खरीप हंगामात पेरल्या जाणार्‍या बियाण्यांतील ३० नमुने कृषी विभागाने तपासले असून त्यात २० नमुने सोयाबीनचे आहेत. यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा काळा बाजार होण्याची शक्यता असल्याने गुणनियंत्रकाकडून सोयोबीनच्या बियाण्यांवर अधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण ३ लाख ६० हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. पेरणीयोग्य क्षेत्रात यंदा १ लाख ९१ हजार ७२७ क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गतवर्षी १ लाख २० हजार पैकी ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. यंदा त्यात आणखीच घट होण्याची शक्यता असल्याने केवळ ९६ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. दुसरीकडे ३२ वरून २७ हजार हेक्टवर तूर, १७ वरून १३ हजार हेक्टरवर मुगाचे क्षेत्र यंदा घसरले आहे. इतर पिकांचा पेरा घटून सोयाबीनचा पेरा ३९ हजार हेक्टरने वाढला आहे. वाढलेल्या क्षेत्रासाठी जिल्ह्यात सोयाबीनच्या बियाण्यांची उपलब्धता नाही. जवळपास ४० हजार क्विंटल सोयाबीनची कमतरता भासण्याची शक्यता आहे. परिणामी सोयाबीनच्या बियाण्याचा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. कंपन्यांच्या नावाखाली बनावट बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कृषी विभागाच्या गुण नियंत्रकाकडून बियाण्यांची तपासणी केल्या जात आहे. एप्रिल महिन्यापासून बियाण्यांचे नमुने तपासले जात आहेत. त्यात गुरूवारपर्यंत एकूण ३० नमुने घेण्यात आले आहेत. बियाण्यांच्या लॉटमध्ये रॅण्डम पद्धतीनुसार हे नमुने काढले जात आहेत. काढलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविण्यात आले आहेत. सध्या ३० पैकी २० नमुने सोयाबीनच्या बियाण्यांचे घेण्यात आले आहेत. उर्वरित कापूस, तूर आदी पिकांच्या बियाण्यांचे मिळून १० नमुने आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात प्रत्येकी १ गुणनियंत्रक नेमण्यात आला आहे. प्रत्येकाला उद्दीष्ट देण्यात आले असून गुणनियंत्रकाकडून लॉटनिहाय नमुने तपासणीला पाठविल्या जात असल्याची माहिती संजय नाब्दे यांनी दिली. (प्रतिनिधी)