शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘छावणी’च्या निवडणूक खर्चाची चौकशी

By admin | Updated: April 7, 2015 01:29 IST

औरंगाबाद : औरंगाबादेत छावणी परिषदेच्या निवडणुकीवर अहमदनगरपेक्षा तब्बल सातपट जास्त खर्च करण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत छावणी परिषदेच्या निवडणुकीवर अहमदनगरपेक्षा तब्बल सातपट जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे परिषदेच्या सर्वच नगरसेवकांनी या खर्चावर जोरदार आक्षेप घेऊन यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच उधळपट्टी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही केली. त्यावर ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी निवडणूक खर्चाबाबत सखोल चौकशीचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यापासून पुढील काही दिवस दररोज छावणी परिषदेच्या बैठकीत खर्चाच्या प्रत्येक बाबीवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. छावणी परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीवर छावणी परिषद प्रशासनाने तब्बल ४४ लाख ७२ हजार रुपये खर्च केले. नवनिर्वाचित सदस्यांनी या खर्चावर आक्षेप घेतल्यामुळे ब्रिगेडिअर मनोजकुमार यांनी आज परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. सभेला उपाध्यक्ष किशोर कच्छवाह यांच्यासह सर्वच नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक मिर्झा रफत बेग आणि प्रशांत तारगे यांनी मुख्याधिकारी विनीत लोटे निवडणूक काळात बरेच दिवस रजेवर होते. त्यांच्या गैरहजेरीत कार्यालयीन अधीक्षिका वैशाली केणेकर आणि लिपिक शेख साजिद यांच्या देखरेखीखाली निवडणुकीचा खर्च झाल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर केणेकर यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी समिती नेमण्यात आली होती, असा खुलासा केला. तेव्हा समितीतील इतर सदस्यांकडे त्याविषयी विचारणा करण्यात आली. २मात्र, संबंधित सदस्य कर्मचाऱ्यांनी आमची भूमिका कोटेशन मंजुरीपुरतीच मर्यादित होती, असे सांगून हात वर केले. सुरुवातीला वाहन आणि मंडप नियोजनाची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक बन्सीले यांच्याकडे सोपविण्यात आली होती, मग लिपिक साजिद शेख यांनी हे काम कसे केले, असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केला. नगर छावणी परिषदेच्या निवडणुकीत वाहनांवर अवघा १२ हजारांचा खर्च झाला. हा खर्च औरंगाबादेत १० लाख २९ हजार झाला. त्याचप्रमाणे तेथे मंडपावर अवघे ६० हजार रुपये खर्च झाले. औरंगाबादेत मात्र, प्रशासनाने मंडपावर तब्बल १५ लाख ३९ हजारांचा खर्च केला आहे. याचप्रमाणे इतरही बाबींमधील अफाट तफावत नगरसेवकांनी सभागृहासमोर मांडली.