शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये औद्योगिक सुरक्षा कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:55 IST

कामगारांच्या सुरक्षेची कारखानदारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी कारखान्यात सुरक्षा आॅडिट करावे. अपघातानंतर कंपनी मालकांबरोबर आॅडिटरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा कामगारमंत्री संभाजीराव पा.निलंगेकर यांनी वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देअपघाताचे प्रमाण चिंताजनक - कामगारमंत्री निलंगेकर

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : कामगारांच्या सुरक्षेची कारखानदारांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. उद्योजकांनी कारखान्यात सुरक्षा आॅडिट करावे. अपघातानंतर कंपनी मालकांबरोबर आॅडिटरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा कामगारमंत्री संभाजीराव पा.निलंगेकर यांनी वाळूजच्या आॅटो क्लस्टरमध्ये आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी येथे दिला.वाळूजच्या आॅटो क्लस्टर येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व परस्पर सहाय्य गटातर्फे (मार्ग) सुरक्षा अधिकारी कार्यशाळा व स्वयंसुरक्षेसाठी सुरक्षा साधनाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक सुधाकर राठोड, प्रधान सचिव राजेंद्र कुमार, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, अरुण विधेळ, मार्गचे अध्यक्ष जयेंद्र भिरूड, सचिव अमित दगडे, स्वप्नील देशमुख, सीएमआयचे प्रसाद कोकीळ, राम दहिफळ, प्रमोद सुरसे आदींची उपस्थिती होती. यावेळी निलंगेकर म्हणाले की, कुशल कामगारांमुळे राज्य गुंतवणुकीत देशात अग्रेसर आहे. परंतु कारखान्यांमधील अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. त्याविषयी उद्योजकांनी काळजी घ्यावी.सुरक्षा साहित्याच्या प्रदर्शनात ४० कंपन्यांचा सहभागयानिमित्त भरविण्यात आलेल्या सुरक्षा साधने साहित्य या प्रदर्शनात सुरक्षा साधनाचे उत्पादन करणाºया ४० कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सेफ्टी शूज, हॅण्डगोल्ज, सेफ्टी बेल्ट आदींसह विविध सुरक्षा साधने प्रदर्शनात त्यांनी मांडली होती. यावेळी निलंगेकर यांनी विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. या प्रदर्शनात कंपनीत अपघात टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रदर्शनाला उद्योजकांनी गर्दी केली होती.कामगार सुरक्षेसाठी नवीन पॉलिसीकामगारांना आरोग्य व सुरक्षेचे कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवीन पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीमुळे कंपनी कामगारांबरोबर त्यांच्या कुटुंबियांना मदत होणार असल्याचे कामगारमंत्री निलंगेकर यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रात कामगारांची चांगल्या प्रकारे सुरक्षा करणाºया उद्योगांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मंत्री निलंगेकर यांनी घोषित केले.औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक सुधाकर राठोड यांनी कारखान्यांतील सुरक्षेविषयी सखोल मार्गदर्शन करून अपघात टाळण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे गरज व्यक्त केली. सध्या एक हजार कामगारांमध्ये केवळ एक सुरक्षा अधिकारी असल्याने कामगारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. नवीन कायद्यामध्ये २५० कामगारांमागे एक सुरक्षा अधिकाºयाची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली असून, अपघाताचे प्रमाण शून्य टक्के करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कामगार सुरक्षा प्रारूप आराखडा व संस्थेच्या संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत शनिवारी चार सत्रांत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उद्या रविवारी दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून, त्यानंतर समारोप होईल.