शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, इंजेक्शन द्या अन् पटकन वजन कमी करा! सडपातळ होण्यासाठी ‘वेट लॉस इंजेक्शन’चा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:37 IST

"जिम नको, डाएट नको, फक्त इंजेक्शन द्या!" स्लिम होण्याच्या नादात तरुणाईची डॉक्टरांकडे अजब मागणी; 'शॉर्टकट' ठरू शकतो जीवघेणा.

- संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर :
‘लग्न ठरलंय, पटकन स्लिम व्हायचंय...’, ‘आई होण्यासाठी वजन कमी करायचं आहे...’, ‘ऑफिसमध्ये चांगलं दिसायला हवं...’ अशा अनेक कारणांसाठी आता अनेक रुग्ण स्वतःहून वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनची मागणी करत लागल्याचे डॉक्टर सांगत आहेत. पूर्वी डॉक्टरांनी सुचविल्यानंतरच दिली जाणाऱ्या या इंजेक्शनचा रुग्णांकडूनच आग्रह धरला जात आहे.

जीम, डाएट, चालणे, योगा या पारंपरिक मार्गांनंतर आता वजन कमी करण्यासाठी इंजेक्शनचा पर्याय चर्चेत आला आहे. विशेषतः सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर्सकडून या इंजेक्शन्सची चर्चा वाढल्याने शहरातील तरुणाई, विविध क्षेत्रांतील कर्मचारी तसेच स्थूलतेने त्रस्त नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, डॉक्टरांनी याचा ‘शॉर्टकट’ म्हणून वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.

ही इंजेक्शन वजन कसे कमी करते?
- हार्मोनसारखे शरीरात काम करते.
- रक्तातील साखर कमी करते (इन्सुलिन वाढवते, ग्लुकागॉन कमी करते).
- पोट धीम्यागतीने रिकामे होते, भूक कमी.
- मेंदूच्या भूक केंद्रावर परिणाम करून क्रेव्हिंग कमी.
- त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित, आणि वजन कमी होण्यास मदत होते.

जीवनशैलीत बदल महत्त्वाचा
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, इंजेक्शन हे फक्त सहाय्यक साधन आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, झोप आणि ताण नियंत्रण याशिवाय कायमस्वरूपी वजन कमी होऊ शकत नाही. इंजेक्शन बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याची शक्यताही असते.

६० टक्के महिला, ४० टक्के पुरुष
लठ्ठपणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण ६० टक्के, तर पुरुषांचे प्रमाण ४० टक्के आहे. १० लठ्ठ रुग्णांपैकी २ ते ३ रुग्णांना इंजेक्शन दिले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

इंजेक्शनचा वाढता ट्रेंड का?
- लग्नसराईपूर्वी वजन कमी करण्याची घाई
- सेल्फी आणि सोशल मीडियाचा प्रभाव
- जिम-डाएटला पर्याय शोधणारे तरुण
- सेलिब्रिटी चर्चेमुळे वाढले आकर्षण
- ‘जलद परिणाम’ची मानसिकता
- ऑनलाइन सल्ल्यामुळे वाढता धोका

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे
सेमाग्लुटाइड / तिर्झेपटाइड इंजेक्शन मुख्यतः टाइप २ मधुमेह , रक्तदाब, हृदयविकार,सांध्याची झीज, घोरण्याची समस्या असलेल्या प्रौढांसाठी ( बीएमआय २७ पेक्षा जास्त) आणि लठ्ठपणाच्या (बीएमआय ३० पेक्षा जास्त) समस्या असणाऱ्यांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरले जाते. हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
- डाॅ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ

ज्यांना गरज, त्यांनाच इंजेक्शन
ओपीडीत येणारे अनेक रुग्ण वजन कमी करण्यासाठी स्वत:हून इंजेक्शनची मागणी करतात. परंतु सर्वांनाच हे इंजेक्शन दिले जाते असे नाही. शिवाय सुरुवातील व्यायाम, आहाराच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतरही वजन कमी झाले नाही तर ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन दिले जाते.
- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह, लठ्ठपणा, हार्मोन्सतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Weight Loss Injections: A Quick Fix Trend Causing Concern

Web Summary : Demand surges for weight loss injections, fueled by social media and quick-fix desires. Doctors caution against overuse, emphasizing lifestyle changes. Injections are supplements, not replacements for diet and exercise.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य