शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांचा वाढला वापर

By admin | Updated: August 2, 2014 01:47 IST

औसा : तालुक्यात यावर्षी ८५ ते ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या़ आहेत़यातील ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून बहुतांशी क्षेत्रावरील सोयाबीनची उगवणच झाली नाही़

औसा : तालुक्यात यावर्षी ८५ ते ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या़ आहेत़यातील ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून बहुतांशी क्षेत्रावरील सोयाबीनची उगवणच झाली नाही़ सोयाबीनसह अन्य जी पिके उगवली आहेत़ त्यामध्ये रिमझिम पाऊसामुळे बारीक तण वाढले आहे़ हे तण काढण्यासाठी रोजंदारीवर जास्त खर्च होतो म्हणून शेतकरी तणनाशक औषधे वापरावर भर देत आहे़तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठे आहे़ पाऊस पडला की सर्व शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई सुरु होते़ पेरणीनंतर पिकांतील खुरपणीस सुरुवात होते़ सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी धावपळ असल्याने खुरपणीसाठी मजूर महिलांची कमतरता भासते़ त्यामुळे आपोआपच मजुरीचे दर ही वाढतात़ मागील दोन-तीन वर्षांपासून विविध पिकांमध्ये फवारणीसाठी वेगवेगळ्या प्रकाराची तणनाशके बाजारात आली आहेत़ मजुर टंचाईवर उपाययोजना म्हणून आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर सुरू केला आहे़सध्या शेतकरी सोयाबीन पिकावर मुख्य लक्ष केंद्रीत करून आहे़ सुरूवातीला ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या ते शेतकरी सोयाबीनची कोळपणी करून तणनाशक फवारणी करीत आहे़ बाजारात १ हजार ५०० रूपयांपासून ते २ हजार २०० रूपये लिटरपर्यंत तणनाशक औषधे उपलब्ध आहेत़ एक लिटर तणनाशकामध्ये साधारण तीन ते साडेतीन एकर क्षेत्राची फवारणी होते़ मजुरावर खुरपणी करायचे म्हटले तीन एकर क्षेत्राला साधारण ६ ते ७ हजार रूपये खर्च होतो़ वेळ आणि पैशाची बचत म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करीत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस तण नाशकांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे़ (वार्ताहर)