मजूर संख्या वाढवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

By Admin | Updated: November 4, 2014 01:37 IST2014-11-04T00:51:58+5:302014-11-04T01:37:20+5:30

उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज् ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा

Increase the number of laborers, otherwise deal with the action | मजूर संख्या वाढवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

मजूर संख्या वाढवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा



उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज्
ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा ३ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला. योजनेला गती देण्याच्या स्पष्ट सूचना देतानाच १५ दिवसांमध्ये मजुरांची संख्या किमान १० हजारावर गेली पाहिजे, असे आदेशित केले. त्यामुळे आता तालुकास्तरावरील यंत्रणा किती प्रमाणात अंग झटकून कामाला लागल्या हे १५ दिवसानंतरच समोर येणार आहे.
मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. मात्र या योजनेलाच जिल्ह्यात घरघर लागली. मागील आठवडाभरात अवघी ७७ कामे सुरु होती. मजुरांची संख्याही १ हजाराच्या घरातच होती. या अनुषंगानेच ‘लोकमत’ने ‘राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोहयोसंदर्भात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मजूर आणि शेतमजुरांनाही रोहयोच्या माध्यमातून नवीन कामे सुरु करुन रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार सेवकांच्या कामाचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले. जे अधिकारी या कामामध्ये कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात कामे सुरु आहेत. मजुरांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये किमान १० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याला किमान एक ते दीड हजार मजुरांच्या हाताला काम द्यावे लागणार आहे.
रोजगाराअभावी एकही मजूर वंचित राहता कामा नये. नरेगाच्या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर तातडीने निवारण करावे. रोहयोची कामे वेळेत होत नसतील तर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा, असे निर्देशही डॉ. नारनवरे यांनी दिले.
शौचालयाची अवघी
९३९ कामे सुरु
४रोहयो अंतर्गत विविध प्रकारची ३ हजार ७३० कामे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार ४५ कामे पूर्ण झाली आहेत. वैयक्तिक शौचालयाच्या ६ हजार ३८६ कामांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी अवघी ९३९ कामे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.

Web Title: Increase the number of laborers, otherwise deal with the action