शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन जीप धूळखात पडल्याने गैरसोय

By admin | Updated: December 15, 2015 23:30 IST

कळमनुरी : येथे पोलिस ठाण्याला दोन जीपसह व्हॅन देण्यात आलेल्या आहेत; परंतु या दोन्ही जीपला बॅटऱ्या नसल्याने ही वाहने धूळखात पडली आहेत.

कळमनुरी : येथे पोलिस ठाण्याला दोन जीपसह व्हॅन देण्यात आलेल्या आहेत; परंतु या दोन्ही जीपला बॅटऱ्या नसल्याने ही वाहने धूळखात पडली आहेत.त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. येथील ठाण्याला एक जुनी जिप्सी वाहन देण्यात आले आहे. हे वाहनही जुने असल्याने यातून प्रवासही जिकिरीचा बनतो. या जुन्या व खराब वाहनानेच दिवसा व रात्री पेट्रोलिंग करावी लागते. या व्हॅननेच ठाण्यांतर्गत येणाऱ्या ७१ गावांचा कारभार पहावा लागत आहे. एखादी अनुचित घटना घडली तर या जिप्सी वाहनानेच जावे लागते. त्यामुळे पोलिसांना उशीर होतो. कळमनुरी ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ७१ गावाअंतर्गत दीड लाख लोकसंख्या आहे. मात्र बंदोबस्तासाठी अपुरे कर्मचारी आहेत. शिवाय वाहनही नसल्याने येथील पोलिस ठाणे अडचणीत सापडले आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ हे ब्रीद असलेल्या पोलिसांजवळ अपुरे कर्मचारी व चांगले वाहन नसल्याने ते खरे ठरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अचानक मोठी घटना घडली की या जिप्सी वाहनानेच जावे लागते. २ ते ३ महिन्यांपासून ठाण्यातील दोन्ही जीप बंद असल्याने एकाच वाहनावर ठाण्याचा कारभार सुरू आहे. शांतता व सुव्यवस्था ठेवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. मोर्चे, नाकाबंदी, पेट्रोलिंग, आंदोलने, धरणे, उपोषण, रास्ता रोको, विविध ठिकाणचा बंदोबस्त, अचानक उद्भवलेले तंटे मिटविणे, गुन्ह्याचा तपास लावणे, अपघात स्थळी पोहोचणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात. त्यातच वाहन नसल्याने ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मोठी अडचण येते. वाहनांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)