शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात उद्घाटनाचा नारळ

By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST

बीड : जलयुक्त शिवार योजनेचे रणशिंग राज्यशासनाने फुंकले अन् २६ जानेवारीचा मुहुर्त धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदार संघात जलयुक्तचा नारळ फोडला

बीड : जलयुक्त शिवार योजनेचे रणशिंग राज्यशासनाने फुंकले अन् २६ जानेवारीचा मुहुर्त धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आपापल्या मतदार संघात जलयुक्तचा नारळ फोडला. आता याला दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. आज न उद्या जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू होतील असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र ज्या गावात आमदारांनी जलयुक्त योजनेचा नारळ फोडला ते गावच जलयुक्त शिवार योजनेत नसल्याचे बुधवारी समोर आले अन् गावकऱ्यांचा भ्रम निराश झाला.केज तालुक्यातील विडा येथे आमदार संगीता ठोंबरे यांनी जलयुक्त शिवार योजनेचे गावात २६ जानेवारीला मोठ्या थाटात उदघाटन करून विडा हे गाव जलयुक्त मध्ये निवडले असल्याचे घोषीत केले होते. गावात योजना येणार म्हणून ग्रामस्थही खुश होते. उदघाटन कार्यक्रमाच्या पुढे काहीच सुरू झाले नाही. योजने अंतर्गत सुरू करावयाची कामे आज सुरू होतील उद्या सुरू होतील म्हणत दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र विडा गावात जलयुक्त शिवाराचे काम काही सुरू झाले नाही. आमदार व कृषी विभागाचे अधिकारी यांच्यातच समन्वय नसल्याने जलयुक्त शिवार योजनेचे काय होणार असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजने अंतर्गत जिल्ह्यात ३३३ गावे निवडण्यात आलेली आहेत. २६ जानेवारीला केज च्या आमदार संगीता ठोंबरे यांनी मतदार संघातील विडा येथे जलयुक्त शिवार योजनेचा नारळ फोडला खरा, पण हे गावच योजनेत नाही. यामुळे विडा येथील ग्रामस्थांनी आमदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.केज तालुक्यातील विडा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत आहे का याविषयी केज तालुका कृषी अधिकारी एस. बी. खंदारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, विडा या गावचा जलयुक्त शिवार योजनेत पहिल्या यादीत समावेश नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.