शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ चौथ्यांदा, २ तिसऱ्यांदा, एक दुसऱ्यांदा अन् ३ पहिल्यांदाच आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:53 IST

विलास भुमरे, अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव हे तिघे पहिल्यादांच विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात विजयी झालेल्या नऊ आमदारांपैकी अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, प्रशांत बंब हे तिघे चौथ्यांदा, अतुल सावे व प्रदीप जैस्वाल हे दोघे तिसऱ्यांदा, रमेश बोरणारे दुसऱ्यांदा आणि विलास भुमरे, अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव हे तिघे पहिल्यादांच विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.

अब्दुल सत्तार : अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळेस निवडणूक लढविली. त्यात त्यांना २००९ पासून सतत यश आले. सहापैकी तीन वेळेस त्यांच्यासमोर सुरेश बनकर हे प्रतिस्पर्धी होते, हे विशेष.

अब्दुल सत्तारांची निवडणूक कारकीर्द अशी :
सन १९९९
किशनराव लक्ष्मणराव काळे - भाजपा -४३,०७९- विजयी
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- अपक्ष- २७,७६०- पराभूत

सन २००४
सांडू आनंदा लोखंडे - भाजपा- ५४,२९० - विजयी
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस -५३,९८९- पराभूत

सन २००९
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस - ९८,१३१- विजयी
सुरेश पांडुरंग बनकर - भाजपा- ७१,३७८- पराभूत

सन २०१४
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- काँग्रेस - ९६,०३८- विजयी
सुरेश पांडुरंग बनकर - भाजपा- ८२,१९७- पराभूत

२०१९
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- शिवसेना- १,२३,३८३- विजयी
प्रभाकर माणिकराव पालोदकर - अपक्ष ९९,००२- पराभूत

२०२४
अब्दुल सत्तार अब्दुल नबी- शिंदे सेना -१,३७,९६०- विजयी
सुरेश पांडुरंग बनकर - उद्धवसेना- १,३५,५४०- पराभूत

औरंगाबाद पश्चिम
तत्कालीन महापालिकेत नगरसेवक असलेले संजय पांडुरंग शिरसाट यांना शिवसेनेने २००९ मध्ये औरंगाबाद पश्चिम एससी राखीव मतदारसंघातून उतरविले. तेव्हापासून शिरसाट यांनी सातत्याने हा मतदारसंघ कायम राखत काल झालेल्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळविला. विशेष म्हणजे या चारपैकी दोनदा त्यांच्यासमोर राजू शिंदे हे प्रतिस्पर्धी होते. याशिवाय आंबेडकर चळवळीचे अग्रणी गंगाधर गाडे आणि काँग्रेस जुने जाणते नेते चंद्रभान पारखे यांचाही त्यांनी पराभव केला आहे.

संजय शिरसाट यांची निवडणूक कारकीर्द अशी :
२००९
संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना - ५८,००८- विजयी
चंद्रभान बंडूजी पारखे - काँग्रेस -४३,७९७- पराभूत

२०१४
संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना -६१,२८२- विजयी
गंगाधर सुखदेव गाडे -पीआरपीई -३५,३४८- पराभूत

२०१९
संजय पांडुरंग शिरसाट- शिवसेना - ८३,७९२- विजयी
राजू रामराव शिंदे - अपक्ष ४३,३४७- पराभूत

२०२४
संजय पांडुरंग शिरसाट- शिंदेसेना - १,२२,४९८- विजयी
राजू रामराव शिंदे - अपक्ष १,०६,१४७- पराभूत

जिल्ह्यात तिघे चौथ्यांदा आमदार
प्रशांत बन्सीलाल बंब

जिल्हा परिषदेचे रण गाजविलेले प्रशांत बंब यांनी २००९मध्ये अपक्ष म्हणून गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. तेव्हापासून ते सतत चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये ते भाजपात गेले व मागील तीन निवडणुकांत भाजपाच्या तिकिटावर जिंकले.
प्रशांत बन्सीलाल बंब यांची निवडणूक कारकीर्द अशी :

२००९
प्रशांत बन्सीलाल बंब -अपक्ष--- --- विजयी

२०१४
प्रशांत बन्सीलाल बंब - भाजपा- ५५४८३- विजयी
अंबादास एकनाथ दानवे - शिवसेना - ३८२०५ - पराभूत

२०१९
प्रशांत बन्सीलाल बंब- भाजपा- १०७१९३- विजयी
संतोष अण्णासाहेब माने - रा.काँ.- ७२२२२- पराभूत

२०२४
प्रशांत बन्सीलाल बंब- भाजपा- १२५५५५- विजयी
सतीश भानुदास बंब- राकाँ (शप) १२०५४०- पराभूत

अतुल मोरेश्वर सावे
२०१४ पासून अतुल सावे सतत तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. तिन्ही वेळेस अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचा निसटता विजय झाला. त्यांना भव्यदिव्य विजय प्राप्त करता आला नाही. तिन्ही वेळेस एमआयएमच्या उमेदवाराने त्यांना कडवी झुंज दिली.
अतुल सावे यांची निवडणूक कारकीर्द अशी :

२०१४
अतुल सावे - भाजपा- ६४५२८- विजयी
गफ्फार कादरी - एमआयएम-६०२६८- पराभूत

२०१९
अतुल सावे - भाजपा- ९३९६६- विजयी
गफ्फार कादरी - एमआयएम-८००३६- पराभूत

२०२४
अतुल सावे - भाजपा- ९३२७४- विजयी
इम्तियाज जलिल - एमआयएम-९१११३- पराभूत

तिघे चौथ्यांदा....
प्रदीप शिवनारायण जैस्वाल

सन २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना (डीलिमिटेशन) होऊन औरंगाबाद मध्य हा नवा मतदारसंघ तयार झाला. या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले प्रदीप जैस्वाल. शिवसेनेतून बाहेर पडून जैस्वाल यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून ही जागा लढविली होती. त्यानंतर २०१४ चा अपवाद वगळता जैस्वाल या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले.

प्रदीप जैस्वाल यांची निवडणूक कारकीर्द अशी :
२००९
प्रदीप जैस्वाल - अपक्ष- ४९९६५- विजयी
सय्यद अब्दुल कदिर- राकाँ- ४१५८१- पराभूत

२०१४
सय्यज इम्तियाज जलिल- एमआयएम-६१८४३- विजयी
प्रदीप जैस्वाल - शिवसेना - ४१८६१- पराभूत

२०१९
प्रदीप जैस्वाल - शिवसेना -८२२१७- विजयी
नासेर सिद्दीकी- एमआयएम- ६८३२५- पराभूत

२०१४
प्रदीप जैस्वाल - शिंदेसेना -८५४५९- विजयी
नासेर सिद्दीकी- एमआयएम- ७७३४०- पराभूत

रमेश नानासाहेब बोरणारे
वैजापूर मतदारसंघातून रमेश बोरणारे दुसऱ्यांदा विजयी झाले. दोन्ही वेळेस त्यांनी प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळविला.

२०१९
रमेश बोरणारे - शिवसेना- ९६०३८- विजयी
अभय कैलास पाटील - राकॉ- ३९०२०- पराभूत

२०२४
रमेश बोरणारे - शिंदेसेना- १३३६२७- विजयी
दिनेश परदेशी- उद्धवसेना - ९१९६९- पराभूत

चव्हाण, जाधव, भुमरे नवे चेहरे
जिल्हा परिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले विलास भुमरे (पैठण), अनुराधा चव्हाण (फुलंब्री) व संजना जाधव हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. भुमरे यांचे वडील संदीपान भुमरे हे सतत पाच वेळेस या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून आता सहाव्यांदा त्यांच्या घरात आमदारकी आली आहे. संजना जाधव यांच्या घरातही त्यांचे सासरे, सासू व पती यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर वडील रावसाहेब दानवे आणि भाऊ हेदेखील आमदार, खासदार राहिले आहेत. चव्हाण यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मात्र राजकीय घराण्यातील नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकpaithan-acपैठणkannad-acकन्नडphulambri-acफुलंब्री