शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नियम बदलाचा फटका; आरटीईच्या जागा लाखांत नोंदणी हजारात, गरिबांच्या मुलांचे काय होणार?

By राम शिनगारे | Updated: May 1, 2024 11:55 IST

गोरगरिबांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये मिळणार नाही प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील नामांकित खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीई कायद्यानुसार आपल्या पाल्यास मोफत प्रवेश मिळेल, या आशेने असलेल्या पालकांचा यावर्षी हिरमोड झाला आहे. राज्य शासनाने खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देण्याचे धाेरण स्वीकारले आहे. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये राज्यातील आरटीई पात्र ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांवर फक्त ५९ हजार ३४६ जणांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली होती.

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा- २००९ नुसार (आरटीई) खासगी आस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. या जागांवर गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून शासनाकडे शाळांचे कोट्यवधी रुपये थकले हाेते. त्याविरोधात न्यायालयातही अनेक शाळा चालकांनी धाव घेतली होती. या सर्वांचा परिणाम राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केला आहे.

नव्या बदलानुसार शासकीय, महापालिका, जि. प. च्या शाळांसह अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात असलेल्या खासगी इंग्रजी माध्यमांची शाळा आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरणार नाहीत, असा नियम केला. त्यामुळे मागील वर्षी प्रवेश झालेल्या शेकडो शाळा यावर्षी आरटीईच्या यादीत आल्याच नाहीत. त्यानंतर प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर प्रवेशासाठी सुरुवातीला शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांना प्राधान्य देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पालकांना त्यांच्या घराजवळील आवडीच्या शाळांचा पर्यायच देता येत नाही. ज्या शाळांचा ‘ऑप्शन’ येतो, त्याठिकाणी आरटीई ऐवजी थेट प्रवेश मिळतो. त्यामुळे राज्यभरात आरटीई नोंदणीला प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त सात जणांची नोंदणीशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीईच्या ६ हजार ९३ जागा उपलब्ध असून, त्याठिकाणी ३० एप्रिलच्या सायंकाळपर्यंत फक्त १३ जणांनीच ऑनलाइन नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. तसेच राज्यभरात एकूण ७६ हजार ५३ शाळांमधील ८ लाख ८६ हजार ४११ जागांसाठी ५९ हजार ३४६ जणांनीच ऑनलाइन नोंदणी केली. त्यातील प्रवेश किती जण घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मागील वर्षी पावणेतीन लाख नोंदणीमागील वर्षी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशाच्या राज्यात ९ हजार ८६ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९०६ जागा उपलब्ध होत्या. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी २ लाख ८२ हजार ७८३ जणांनी नोंदणी केली होती.

शासनाचे कोट्यवधी रुपये वाचणारराज्य शासनाचे आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीसाठी कोट्यवधी रुपये शाळा चालकांना द्यावे लागत होते. मात्र, आता आरटीईतून खासगी शाळांमध्ये प्रवेशाचे प्रमाण अतिशय नगण्य असल्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी वाचेल.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाAurangabadऔरंगाबाद