शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.वाळूज औद्योगिक परिसरात शहर बसेसची संख्या नगण्य असल्यामुळे कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, अ‍ॅपेरिक्षा, रिक्षा यातून प्रवास करावा लागतो आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे मनमानी करीत असून, एस.टी.च्या भाड्यापेक्षा जास्त भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे शहर तसेच ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार औद्योगिक परिसरात दररोज ये-जा करीत असतात. बस वेळेवर मिळत नसल्यामुळे कामगार प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरात ये-जा करीत असतात. मात्र, या मार्गावर कमी बसेस असल्यामुळे बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलींना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची भरपूर कमाई होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून भरधाव वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातही दिवसेंदिवस वाढत आहेत. औद्योगिक परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचालकांनी मुख्य चौकाचा ताबा घेऊन या ठिकाणी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. अ‍ॅपेरिक्षा व रिक्षा चालविणारे अनेक वाहनचालकअल्पवयीन असून, अनेकांकडे तर वाहन चालविण्याचा परवाना नाही.अवैध वाहतुकीला अभयया परिसरात अवैध वाहतूक बोकाळली असून, याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे. चौकाचौकात काळी-पिवळी व अ‍ॅपेरिक्षात प्रवासी कोंबून बसविले जातात. वाहतूक पोलिसांसमोर अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. अवैध वाहनधारकांकडून वाहतूक शाखेतील काही कर्मचारी पैशांचे लाभार्थी असल्यामुळे ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप सुरेश गाडेकर, सिद्राम पारे, बसगोंडा पाटील, नारायण हातोळे यांनी केला आहे.