शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यास उत्पादन घटण्याची शक्यता

By admin | Updated: June 20, 2014 00:48 IST

जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे.

जालना: गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लांबला आहे. परिणामी पेरणी खोळंबली आहे. जर पावसाला अजून वेळ झाल्यास उत्पादनात काहीअंशी घट येण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे यांनी वर्तविली. लांबलेला पाऊस व पेरणीची परिस्थितीबाबत घाटगे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले गतवर्षी वेळेत व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे पेरणी अगदी वेळेत पूर्ण होऊ शकली. कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. यावर्षी परिस्थिती पुन्हा बिघडली आहे. १९ जून अखेरही जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी खरीप पेरणी ठप्प झाली आहे. जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेही आपल्याकडे पावसाच्या अंदाजानुसार जून अखेर खरीप पेरण्या सुरु होतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येऊ शकते. जर मोठा पाऊस न पडल्यास सर्वच पिकांना याचा फटका बसू शकतो. यावर्षी ६ लाख पेक्षा जास्त हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्यात सर्वात जास्त ३ लाख हेक्टवर कापसाची लागवड होईल. सोयाबीन दीड लाख त्यानंतर कमी अधिक प्रमाणात मूग, तुरीची लागवड होईल. (प्रतिनिधी)मार्गदर्शन सुरूशेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळावेळी मार्गदर्शन करण्यात येते. यंदाही खरीप हंगामात पेरणीपूर्व तसेच नंतरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खरिपाचे विभागाच्या वितीने नियोजन करण्यात आले आहे. काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही घाटगे यांनी केले.