शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निकालासाठी ‘आई’ ठरली ‘पासवर्ड’

By admin | Updated: June 18, 2014 01:40 IST

सोमनाथ खताळ , बीड दहावी-बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉर्इंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सूकता कोणाला असणार नाही?

सोमनाथ खताळ , बीडदहावी-बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉर्इंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सूकता कोणाला असणार नाही? परंतू आॅनलाईन निकाल प्रक्रियेत एका क्लिकआड दडलेले यशापयश जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाचा पासवर्ड वापरावा लागला.निकाल जाणून घेताना संगणकीकृत पद्धतीच्या वापरामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने लढविलेली ही शक्कल बऱ्याच अंशी यशस्वी ठरली. इतकेच नव्हे तर यामुळे यशाप्राप्तीतही मुलांना आईचे विस्मरण झाले नाही आणि अपयशामुळेच खचलेल्या आईच्या नावामुळे अप्रत्यक्ष बळही मिळाले.नुकतेच दहावी-बारावीचे निकाल आॅनलाईन जाहीर झाले. संगणकावर केंद्र क्रमांक आणि रोल नंबर टाकुन कोणालाही कुणाचा निकाल आतापर्यंत पहाता येत होता. त्यामुळे या पद्धतीचा गैरवापर सर्रास होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या लक्षात आले होते. ही पद्धत गैरसोयीची आणि पुरेशी पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाल्याने या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार मंडळाने केला. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून आॅनलाईन निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्याला पासवर्ड म्हणून स्वत:च्या आईचे नाव टाकणे बंधनकारक करण्यात आले. आईचे नाव संगणकाने ग्राह्य धरल्यानंतरच निकाल विद्यार्थ्यांना बघण्यासाठी मिळाला. या नव्या उपक्रमामुळे निकाल बघताना होणाऱ्या गैरव्यवहारांना तर आळा बसलाच पण मुलांनाही आईचे नावाचे महत्व कळाले.विद्यार्थ्यांच्या जीवनात बारावी परीक्षेचे असलेले महत्व लक्षात घेता यशाच्या पायरीवर चढताना विद्यार्थ्यांना आपल्या आईची कायम आठवण रहावी, ही कल्पकता शिक्षण मंडळाने याच्या माध्यमातून दाखविली आहे. शिक्षण मंडळातर्फे वेबसाईटवर निकाल पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आईचा नावाच्या पासवर्डचा वापर करूनच यशापयशापर्यंत पोहंचता आले.या पद्धतीचा वापर करण्यासाठी शिक्षण मंडळाने निकालासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला. शिक्षण मंडळाचा हा प्रयोग बऱ्याचा अंशी यशस्वी ठरला. शिक्षण मंडळाने आईच्या नावाचा अशा कल्पक पद्धतीने वापर करून विद्यार्थ्याला आईची आठवण पासवर्डच्या रूपाने अनिवार्य करून एक आदर्श प्रस्तुत केला आहे.आईचा खऱ्या अर्थाने सन्मानबारावीच्या निकालात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न शिक्षण मंडळाने केला आहे. पासवर्ड म्हणून आईचे नाव अनिवार्य केल्याने एरव्ही महाविद्यालयीन जीवनात केवळ वडीलांच्याच नावाचा वापर करण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना आता काहीतरी प्रक्रिया म्हणून का होईना आईचे नाव वापरावेच लागेल, अशी प्रतिक्रिया चिंचाळ येथील अशोक माध्यमिक विद्यालयातील उपप्राचार्य सुशांत काळे यांनी व्यक्त केली.