शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रो टेस्टविना सीएनजी वाहनांचा वापर सुरूच

By admin | Updated: August 21, 2014 00:11 IST

हायड्रो टेस्टविना सीएनजी वाहनांचा वापर सुरूच

मुजीब देवणीकर, औरंगाबादपेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा म्हणून शासनाने रिक्षा, बस, चारचाकी वाहनांमध्ये सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि एलपीजीच्या (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनधारकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी हायड्रो टेस्ट बंधनकारक असताना अनेक वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सीएनजी गॅस ज्या टाकीत भरावा लागतो, त्या टाकीची हायड्रो प्रेशर टेस्ट करावी, असा नियम केंद्र सरकारच्या विस्फोटक विभागाचा आहे. राज्य परिवहन आयुक्तांनीही हायड्रो प्रेशर टेस्ट करून घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. परंतु ज्या वाहनांनी गॅस कीट बसविले आहे, ते वाहनधारक आणि शासन अशा प्रकारची चाचणी करण्याबाबत उदासीन आहे. शहरात तब्बल ७ हजार सार्वजनिक वाहने कोणत्याही टेस्टशिवाय रस्त्यांवर धावत आहेत. सीएनजी भरणाऱ्या केंद्रावर हायड्रो प्रेशर टेस्ट केली आहे की नाही, हे तपासणे अनिवार्य आहे. ज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे तेथून ब्रेक वायर किंवा एक्सल वायरचे टाकीबरोबर वारंवार घर्षण होते. या सर्वांचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. त्यानंतर सीएनजी सिलिंडर असुरक्षित बनते. असुरक्षित सिलिंडरचा स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होऊ शकते. शहरात अनेकदा भरधाव वाहनांनी पेट घेतला आहे. यामागचे कारण एकच की, हायड्रो प्रेशर टेस्ट करण्यात आलेली नाही.दोन महिन्यांपूर्वी जळगाव रोडवर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एका रिक्षाला आग लागली होती. अशा घटना वारंवार घडत असतानाही आरटीओ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. यासंदर्भात आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, औरंगाबादेत हायड्रो प्रेशर टेस्टची सुविधा उपलब्ध नाही.