शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

हदगाव : उमरी (ज़) ता. हदगाव येथील इसमाने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्यानंतर गळफास लावून स्वत:लाही संपविले़ यामुळे चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले

हदगाव : उमरी (ज़) ता. हदगाव येथील इसमाने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्यानंतर गळफास लावून स्वत:लाही संपविले़ यामुळे चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले व म्हाताऱ्या आईचा आधारही गेला़ या कृत्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली़ ज्या पतीने खून केला, त्याच्यासोबतच अंत्यसंस्कार घेण्याची वेळ पत्नीवर आली़आठ दिवसांपूर्वीच हे कुटुंब सासरवाडी नायगाव येथून गावात आले़ दोघांत काय वाद झाला हे चंद्रकांतच्या आईला व मुलीलाही माहीत झाले नाही़ १५ मे रोजी रात्री तिन्ही मुली उकाड्यामुळे आजीसोबत अंगणात झोपल्या़ पती-पत्नी घरात होते़ कान्होपात्राला पतीच्या मनातील डाव कळालाच नाही़ झोपेत असताना चंद्रकांतने तिच्या मानेवर कुऱ्हाडीचा मोठा घाव घातला़ त्यानंतर दुसरा़ दोन घावातच कान्होपात्रा संपली़ त्या एका अंगावर झोपलेल्या स्थितीतच होत्या़ बाजेवर रक्ताचा डोह साचला़ भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या़ यानंतर काही वेळातच घराच्या पत्राखाली लाकडाला गळफास लावून चंद्रकांतने स्वत:लाही संपविले़ सकाळ झाली तरीही दार उघडले नसल्याने आजीने एका नातीला आईबाबांना उठव असे सांगितले़ प्रतिसाद मिळाला नसल्याने तिने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता घटना उघडकीस आली. गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, पोलिस पाटील, डॉ़ यु़ व्ही़ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक गोमारे यांनी पंचनामा करून प्रेतांची उत्तरीय तपासणी वायफना आरोग्य केंद्रात केली़ दुपारी ४ च्या दरम्यान पती-पत्नीवर उमरी (ज़) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ चारही मुलींच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावले़ खुनी चंद्रकांत याच्या गळ्यामध्ये पाच ते सहा चिठ्ठ्या आढळल्या़ मात्र त्यातील मजकूर कळाला नाही़ एकूणच या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे़ ६५ वर्षांची आई, १३, ६ व ३ वर्षाच्या मुलींचे आयुष्य या पित्याने किरकोळ कारणामुळे उद्ध्वस्त केले़