शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे प्रचंड हाल

By admin | Updated: December 18, 2015 00:21 IST

औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस. टी. बससेवा काही वेळेसाठी बंद झाली तर काय होऊ शकते, याची प्रचीती गुरुवारी हजारो प्रवाशांना आली.

औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस. टी. बससेवा काही वेळेसाठी बंद झाली तर काय होऊ शकते, याची प्रचीती गुरुवारी हजारो प्रवाशांना आली. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पहाटेपासूनच बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ शकल्या नाहीत. दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेने कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यास कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेतली. परंतु बससेवा केव्हा सुरू होणार, याची त्यांना कोणतीही माहिती मिळत नव्हती. एखादी तरी बस मिळेल, या आशेने प्रवासी धडपडत होते. नियमित फेऱ्या रद्द झाल्याने शेकडो प्रवासी तासन्तास बसस्थानकात खोळंबले. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ही बस जाणार का? कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गर्दी करीत होते. थांबलेल्या बसमध्ये सामान घेऊन प्रवासी बसत असताना त्यांना अडविले जात होते. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत होती. यामध्ये वृद्ध आणि बालकांचे सर्वाधिक हाल झाले. बसस्थानकात तासन्तास थांबूनही बस जाणार नसल्याचे लक्षात येताच प्रवासी खाजगी बसगाड्या आणि काळी-पिवळीचा रस्ता धरीत होते. परंतु अशा परिस्थितीत खाजगी वाहतूकदारांनी जादा भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली. बीडसाठी एस. टी. बसचे भाडे जवळपास १४५ रुपये आहे. परंतु खाजगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून तब्बल ४०० ते ५०० रुपये उकळले. अशीच परिस्थिती अन्य ठिकाणांसाठीही होती. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नाइलाजाने काही प्रवाशांनी हा भुर्दंड सहन केला. कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. मध्यवर्ती बसस्थानकात माजी आमदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेसचे अ‍ॅड. सय्यद अक्रम, प्रवक्ते डॉ. पवन डोंगरे, इब्राहिम पठाण, गुलाब पटेल, राजेंद्र दाते पाटील, कैलास पठारे, शेख अथर, श्रेयस नावंदर, खालेद पठाण, डी. ए. लिपणे पाटील, सुरेश जाधव, जे. एस. ढाकणे, किरण कल्हापुरे, श्याम दाभाडे, गजानन पवार, प्रेमानंद कर्णे आदींची उपस्थिती होती. सिडको बसस्थानकात मच्ंिछद्र बनकर, मिलिंद मुळे, अजय गायकवाड, महेश बोचरे, कपिल गोंधळे, प्रवीण चव्हाण, विजय राठोड, शिवाजी जाधव, अजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.