शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पेन्शनमध्ये जगायचे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:20 IST

औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला.

औरंगाबाद : अल्प पेन्शनमुळे महागाईच्या दिवसात जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून पेन्शनधारकांनी बुधवारी शांती मोर्चा काढला. महागाई भत्त्यासह मासिक ७,५०० रुपये पेन्शन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी मोर्चास हिरवा झेंडा दाखविला. शहागंज, चेलीपुरामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अल्प पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. मोर्चाचे रूपांतर छोटेखानी जाहीरसभेत झाले. ईपीएस-९५ निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष पी.पी. देशमुख, सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष देवकर, सल्लागार स.सो. खंडाळकर यांची यावेळी भाषणे झाली. मोर्चामध्ये विविध निमसरकारी संस्था, कंपन्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातूनही अल्पपेन्शनधारक मोठ्या संख्येने आले होते. रामचंद्र नवपुते, नीळकंठ वरकड, रामराव बोर्डे, हिरामण चव्हाण, चंद्रकांत पोतदार, निर्मला बडवे, माधुरी जोशी, पुष्पा चव्हाण, शारदा देवकर, पुष्पा काळे, कमल मते, शशिकला जोशी, अरविंद अवसरमोल, कांतराव मोदी, व्ही.आर. चव्हाण, जी.व्ही.गाडेकर, डी.के.पाटील, रमेश भालेराव, तेजराव मिरगे, धनसिंग परदेशी, अंगद सरवदे, टी.वाय. देशमुख, डी.एस. वाळेकर आदी मोर्चात सहभागी झाले होते.