धारकल्याणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले

By Admin | Updated: December 22, 2014 23:42 IST2014-12-22T23:42:29+5:302014-12-22T23:42:29+5:30

जालना : भुतान येथील इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत भारताच्या संघाने चमकदार कामगिरी करीत चषकावर नाव कोरले. त्या विजेत्या संघात धारकल्याण (ता.जालना) येथील खेळाडू सहभागी होते.

Holder's players shine in international competition | धारकल्याणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले

धारकल्याणचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकले


जालना : भुतान येथील इंडो-भुतान आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत भारताच्या संघाने चमकदार कामगिरी करीत चषकावर नाव कोरले. त्या विजेत्या संघात धारकल्याण (ता.जालना) येथील खेळाडू सहभागी होते.
भूतान येथे १२ डिसेंबरपासून १७ वर्ष वयोगटातील टार्गेट बॉल स्पर्धा सुरु झाल्या. रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघाने चार सामन्यापैकी ३ सामने जिंकून इंडो-भूतानवर मात केली. मुलींच्या संघाने सहा पैकी चार सामने जिंकले. या खेळाडूंमध्ये विशाल विष्णू ढोबळे, रेणुका कळकुंबे, साक्षी क्षीरसागर, सविता म्हस्के यांचा समावेश असून हे चौघेही जालना तालुक्यातील धारकल्याणचे रहिवाशी व रंगनाथ महाराज हायस्कूल नाव्हाचे विद्यार्थी आहेत.
सदर खेळाडू परतल्यानंतर त्यांचा धारकल्याण येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यावेळी रंगनाथराव ढोबळे, रावसाहेब इंगोले, रामप्रसाद डोंगरे, विष्रू ढोबळे, अमर डांगे, ज्ञानेश्वर इंगोले, बबनराव मिसाळ, मुक्तार पठाण, राजेंद्र ढोबळे, कारभारी एखंडे, प्रशांत नवगिरे, हरिभाऊ ढोबळे, सुंदर इंगोले, अशोक ढोबळे, रखमाजी ढोबळे, उध्दव इंगोले, काकासाहेब उगले, विष्रू घोडके, प्रभाकर तिरुखे, नासेर पठाण ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय टार्गेट बॉल स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या मुलांच्या यशात प्रशिक्षकांचा निश्चितच मोठा वाटा असल्याचे मत विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केले. या स्पर्धांमधून सांघिक खेळाची भावना महत्वपूर्ण ठरल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सब ज्युनिअर टार्गेट बॉल स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी सहा महिने मोठे कष्ट करावे लागले. मेहनत आणि सांघिक भावनेमुळेच हे यश संपादन करता आले.
- प्रशांत नवगिरे (प्रशिक्षक)
ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्यातील सुप्त गुणे लक्षात येणार नाहीत. येथील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन करून धारकल्याण सारख्या गावासह जिल्ह्याचा नावलौकिक केला. यशस्वीतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- रावसाहेब इंगोले (सरपंच)

Web Title: Holder's players shine in international competition