शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गारांचा मारा!

By admin | Updated: April 11, 2015 00:21 IST

बीड : गुरूवार पाठोपाठ शुक्रवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे नुकसानीत भरच पडली असून, गारांच्या माऱ्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग १५ मिनिटे ठप्प होता.

बीड : गुरूवार पाठोपाठ शुक्रवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे नुकसानीत भरच पडली असून, गारांच्या माऱ्याने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग १५ मिनिटे ठप्प होता. उन्हाळी पिकांनाही फटका बसला आहे.गुरूवारी रात्री नऊ वाजता बीडसह काही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात गरमी निर्माण झाली होती. आकाशात दाटून आलेले ढग सायंकाळी साडेपाच नंतर कोसळले. बीडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. चाकरमान्यांचे हाल झाले. पावसानंतर वातावरणात थंडावा निर्माण झाला.माजलगाव शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली. गेवराईमध्ये साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. शहर परिसरातील काही घरांवरील पत्रेही उडून गेली. धारूर, शिरूर, परळीमध्ये पाऊस झाला. या पावसाने शहरातील नाल्या, रस्ते जलमय झाले होते. आष्टी तालुक्यात दादेगाव, घाटापिंप्री परिसरात कांद्याची काढणी सुरू आहे. अशातच अवकाळीने हजेरी लावल्यामुळे कांदा पावसात भिजला आहे. अंबाजोगाईत मात्र पाऊस झाला नाही. (प्रतिनिधी)