शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अहिंसा संघाच्या प्रेरणा महासभेचा समारोप

By admin | Updated: July 27, 2014 01:17 IST

हिंगोली : मुंबई येथील अहिंसा संघाच्या वतीने हिंगोली शहरात घेण्यात आलेल्या प्रेरणा महासभेचा समारोप झाला.

हिंगोली : मुंबई येथील अहिंसा संघाच्या वतीने हिंगोली शहरात घेण्यात आलेल्या प्रेरणा महासभेचा समारोप झाला. प.पू. लोकेश चैतन्य स्वामी यांनी गीतेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात केली. तर संगीतकार विनित गोमावत यांच्या संघाने भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा होते. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष इंदरचंद सोनी, राम कयाल, जेठाचंद नैनवाणी, डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, लक्ष्मीकांत शिराडकर, अ‍ॅड. राजेश बियाणी, कन्हैय्यालाल नैनवाणी, हरिराम वर्मा, मुन्नालाल प्रजापती, शिवा महाराज, बबन महाराज घुगे, माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, रमेशचंद बगडिया आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कत्तलखान्याविरोधात जनजागृती करणारा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच प.पु. विराग सागर,विनम्र सागर यांचे प्रवचन ऐकविण्यात आले. कार्यक्रमात कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई वाचविल्याबद्दल राजेश सांगळे, राजाभाऊ मुसळे यांचा सत्कार करण्याात आला. तसेच मांसाने भरलेला ट्रक पकडल्याबद्दल पोलिसांसह विशाल अग्रवाल, कमलकिशोर सोनी, गंगाधर उंबारे, गौतम दात्तार, महेश्वर चौंढेकर, रेशमाजी खराटे, हेमराज सोनी, चंदादेवी सोनी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पारसमल मोतीलाल, बंडू पाटील, किशोर नभीराज यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाशचंद सोनी, राजकुमार बडजाते, मनोज जैन, दीपक सावजी, रविकुमार कान्हेड, रत्नाकर महाजन, सुरेशचंद संचेती, प्रशांत बगडिया, डॉ. प्रेमेंद्र बोथरा आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)