हिंगोलीला ८ तर वसमतला ७ कोटींचा निधी

By Admin | Updated: May 24, 2014 00:47 IST2014-05-24T00:17:32+5:302014-05-24T00:47:56+5:30

हिंगोली : राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील २१ नगर- पालिकांना अनुदान दिले असून,

Hingoli 8 and Vasamat 7 crore fund | हिंगोलीला ८ तर वसमतला ७ कोटींचा निधी

हिंगोलीला ८ तर वसमतला ७ कोटींचा निधी

हिंगोली : राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील २१ नगर- पालिकांना अनुदान दिले असून, त्यामध्ये हिंगोली पालिकेला ८ कोटी तर वसमत पालिकेला ६ कोटी ९५ लाख रुपये दिले असल्याची माहिती हिंगोलीचे नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली. हिंगोली व वसमत शहरात केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हिंगोली शहराच्या योजनेसाठी प्रारंभी ४६ कोटी रुपयांचा निधी यासाठी मिळाला. त्यानंतर १२ कोटी रुपये मिळाले. आता पुन्हा ८ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, आणखी साडेचार कोटी रुपये मिळणे बाकी असल्याचे नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले. राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील २१ नगर पालिकांना निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंगोलीला निधी मिळाला असून वसमतला ६ कोटी ९५ लाख रुपये मिळाले आहेत.

Web Title: Hingoli 8 and Vasamat 7 crore fund