हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:06 IST2026-02-19T13:04:56+5:302026-02-19T13:06:05+5:30

तुमची कार रस्त्यावर उभी करताय? सावधान! उस्मानपुऱ्यात अर्ध्या तासांत दोन आलीशान गाड्या लंपास

High-Tech Car Theft in Chhatrapati Sambhajinagar: Two Luxury SUVs Worth ₹25 Lakh Stolen Within 30 Minutes | हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ!

हातात टॅब अन् २५ लाखांच्या दोन कार गायब; छ. संभाजीनगरमध्ये 'हायटेक' चोरांचा धुमाकूळ!

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या काही मिनिटांत हायटेक पद्धतीने कार चोरणाऱ्या टोळीने शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून सहा दिवसांत दुसऱ्यांदा न्यू श्रेयनगर व उस्मानपुऱ्यातून मंगळवारी रात्रीतून अवघ्या अर्ध्या तासांत २५ लाखांच्या दोन कार चोरून नेल्या. या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढवली असून पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर तिवारी हे कुटुंबासह न्यू श्रेयनगरमध्ये राहतात. २०२३ मध्ये त्यांनी टाटा हॅरिअर कार खरेदी केली होती. घरासमोर पार्किंग नसल्याने ते त्यांची कार मित्र व नगरसेवक राजू वैद्य यांच्या घरासमोर उभी करत होते. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे कार वैद्य यांच्या घरासमोर उभी करून घरी चालले गेले. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी वैद्य यांच्या पत्नीला घरासमोर काचा आढळल्या. संशय बळावल्याने त्यांनी सागर यांच्या पत्नीला विचारणा केली. सागर तेथे पोहोचले. तेव्हा चोरांनी दरवाजाच्या काचा फोडून कार चोरून नेल्याचे दिसून आले.

लगेच दुसरी कार चोरली
नगरसेवक वैद्य यांच्या घरासमोरून चोरांनी ३ वाजून २६ मिनिटांनी अवघ्या १० मिनिटांत कार लंपास केली. त्याच्या अर्ध्या तासानंतर दशमेशनगरमध्ये राहणारे विवेकानंद भोसले यांची देखील ४ वाजता टाटा हॅरियर कंपनीचीच कार चोरून नेली. नगरसेवक राजू वैद्य यांनी तत्काळ पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही घटनांप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हातात टॅब/मशीन, दोघांची हालचाल कैद
११ रेाजी उस्मानपुरा, जवाहरनगरमधूनच दोन कार चोरीला गेल्या. त्यानंतर 'लोकमत' ने 'हायटेक कार चोरी' संदर्भात वृत्त प्रकाशित केेले. यातील एक कार विद्यमान आमदारांच्या निवासस्थानासमोरूनच गेली. मंगळवारी रात्रीच्या घटनेत दोन चोर स्पष्टपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यात एक चोर निवांत हातात टॅब/ओबीडी डिव्हाइस, रिलेबॉक्स हातात घेऊन कारमध्ये बसून कार सुरू करून पसार झाला. विशेष म्हणजे, कार चोरीसाठी चोरांची टोळी अलिशान कारमधूनच रेकी करत शहरात फिरते.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में हाई-टेक चोरों का आतंक, टैब से दो कारें गायब।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में हाई-टेक कार चोरियों में वृद्धि हुई है। चोरों ने इलेक्ट्रॉनिक उपकरणों का उपयोग करके आधे घंटे के भीतर 25 लाख रुपये की दो टाटा हैरियर कारें चुरा लीं, जिससे निवासियों में चिंता बढ़ गई और पुलिस के सामने चुनौती पेश हो गई। सीसीटीवी फुटेज में चोर टैबलेट जैसे उपकरण का उपयोग करते हुए कैद हुए।

Web Title : Hi-tech thieves steal two cars in Chhatrapati Sambhajinagar using tabs.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces a surge in hi-tech car thefts. Thieves stole two Tata Harrier cars worth ₹25 lakh within half an hour using electronic devices, prompting concern among residents and posing a challenge to the police. CCTV footage captured the thieves using a tablet-like device.