शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आपद्ग्रस्तांना ४८ तासांत मदत

By admin | Updated: May 8, 2014 00:41 IST

नांदेड : पावसाळ्यात अचानक उद्भवणार्‍या संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या़

 नांदेड : पावसाळ्यात अचानक उद्भवणार्‍या संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता बाळगण्याच्या सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्या़ त्याचवेळी आपद्ग्रस्तांना ४८ तासांत मदत मिळाली पाहिजे याची खबरदारीही घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले़ जिल्ह्यात ३३७ गावे पुरामुळे बाधित होऊ शकतात अशी माहितीही यावेळी देण्यात आली़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरूवारी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते़ यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, सहायक जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती़ जिल्हाधिकार्‍यांनी प्रारंभी पाणीटंचाई आराखड्याची माहिती देताना मुखेड व कंधार भागात अद्याप काही गावांना टँकर्स सुरू असल्याचे सांगितले़ यावर्षी उद्भवणार्‍या पूर परिस्थितीत सर्व सहायकारी साधनांची उपलब्धता करून ठेवावी़ नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा द्यावा, तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करावेत, सर्व अधिकारी, कर्मचारी, सहाय्य करणार्‍या व्यक्ती यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे़ आपदग्रस्तांना ४८ तासांत मदत मिळवून देता येईल, अशी व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी यावेळी सूचित केले़ ज्या मोबाईलमध्ये अँडरॉईड सिस्टीम आहे त्यावर वेदर सिस्टीम समजू शकेले़ पाऊस किती पडला याची अशा मोबाईलवर माहिती मिळेल असेही ते म्हणाले़ निवासी उपजिल्हाधिकारी डॉ़ निशिकांत देशपांडे यांनी मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचे नियोजन सांगितले, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १०७७१ हा आहे़ सर्व यंत्रणांनी २० मे पूर्वी कृती आराखडे तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत़ साथरोग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, पर्जन्यमापक यंत्र ८० ठिकाणी चालू ठेवावीत़ महापालिका व नगरपालिका क्षेत्रात आवश्यकही पूर्वतयारी ठेवावी असेही त्यांनी सांगितले़ पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्याशी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या़ बैठकीत हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी पावसाबाबतची माहिती सादर केली़ बैठकीस सिंचन, बांधकाम, विद्युत, वन, महसूल आदी विभागाचे प्रमुख तसेच उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)