शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीचा हात

By admin | Updated: June 13, 2016 00:47 IST

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाने आर्थिक व मानसिकरीत्या खचलेल्या शेतकऱ्यांना आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजींच्या अनमोल वाणीने नवऊर्जा मिळाली, सकल जैन समाजाने मदतीचा हात पुढे करून त्यांना मोफत बियाणे व खत दिले... यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवतेज, नवी आशा निर्माण झाली होती. नव्या उमेदीने पुन्हा शेतीच्या कामाला लागू आणि शेतीला सुजलाम, सुफलाम करू, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने गुरु राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभय महोत्सव’ शहरात सुरू आहे. रविवारी सकाळी पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे आयोजित ‘माणुसकी’च्या सोहळ्यात शेतकरी सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रशांत देसरडा यांच्यासह सकल जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे, खत देण्यात आले. राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या भरवशावर देशाची अर्थव्यवस्था चालते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य आहे. जैन समाज नेहमी मदतीसाठी अग्रेसर असतो, असेही त्यांनी नमूद केले. आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला. यंदा पाऊस चांगला पडेल, भरघोस पीक येईल. देव उशिरा देतो, पण अन्याय करीत नाही, असे महाराज म्हणताच शेतकऱ्यांचा चेहरा आनंदाने खुलून गेला. पंन्यास योगरत्न मुनीजी म्हणाले की, मानव प्रेमापासूनच जैन धर्माची सुरुवात होते. सकल जैन समाज नेहमी मदतीसाठी पुढे असतो, आजही शेतकऱ्यांना योग्य वेळी बियाणे-खत वाटप करून जैन समाजाने ‘माणुसकीचे दर्शन’ घडविले. यानंतर शेतकऱ्यांनी आचार्यश्रींचे रांगेत दर्शन घेतले. प्रास्ताविक महावीर पाटणी यांनी तर संचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी चांदमल सुराणा, ललित पाटणी, रतिलाल मुगदिया, मदनलाल अच्छा, विनोद बोकाडिया, मिठालाल कांकरिया, रवी मुगदिया, विलास साहुजी, पीयूष कासलीवाल, नरेंद्र अजमेरा आदी पदाधिकारी व समाजबांधव हजर होते.