शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सतारीतून अवतरले स्वर्गीय सूर...!

By admin | Updated: June 25, 2014 01:06 IST

जालना: फडतारे बंधू यांच्या तबला-संवादिनीची जुगलबंदी, पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद रईस खान यांच्या सतार वादन अन् पं. यादवराज फड यांची भैरवी...

जालना: फडतारे बंधू यांच्या तबला-संवादिनीची जुगलबंदी, पं. सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, उस्ताद रईस खान यांच्या सतार वादन अन् पं. यादवराज फड यांची भैरवी... जालनेकरांसाठी रविवारची सायंकाळ एक संस्मरणीय ठरली. उस्ताद खान यांच्या सितारीतून अलगद अवतरलेल्या सूरांमुळे रसिकांना स्वर्गीय सुखाचा आनंद दिला. निमित्त होते ते ध्यास फाऊंडेशन आॅफ परफॉर्मिंग आर्टस््, कै. बाबूराव जाफराबादकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै. अप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित संगीत समारोहाचे....कार्यक्रमाच्या सुरूवातीस पं. अप्पासाहेब जळगावकर यांचे मानसपुत्र सुरेश फडतारे यांनी हार्मोनियम तसेच हनुमंत फडतारे यांचे तबलावादन झाले. या दोघांनी आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून राग यमन सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. यानंतर या दोघांनी तबल्याचे ताल अन् हार्मोनियमच्या सूरांचा अनोखा संगम घडवित नाट्यगीते, जुगलबंदी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.पं. सुधाकर चव्हाण यांनी सादर केलेलेल्या ‘जुगवा बीत गये’ ही पूरिया धनश्री रागावर आधारित बंदिश तर ‘विठ्ठला.. रे कंठ आळविता...’ या अभंगांमुळे कार्यक्रमात रंगत आणली. पं. चव्हाण यांना तबल्यावर सारंग भंडारी यांनी साथ दिली.उस्ताद रईस खान यांनी आपल्या सितारवादनातून राग देस सादर करत उपस्थितांना निर्झर झऱ्याचा आभास करविला. तबलावादक हनुमंत फडतारे आणि उस्ताद खान यांच्या जुगलबंदीमुळे रसिकांना स्वर्गीय सुरांचा अनुभव आला. शेवटच्या भागात पं. यादवराज फड यांनी शास्त्रीय संगीताचा कलाविष्कार सादर केला. त्यांनी सादर केलेली भैरवी विशेष दाद मिळवून गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रख्यात सतारवादक अतुल देशपांडे, शरद जाफराबादकर, अ‍ॅड. नरेंद्र जाफराबादकर, महेंद्र जाफराबादकर, डॉ. गिरीश पाकणीकर, डॉ. श्रीमंत मिसाळ, अश्विनी वासडीकर, डॉ. प्रतिभा भद्रे, डॉ. जयश्री प्रभू आदींसह संगीतप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)अंबेकर यांच्या हस्ते उद्घाटनजुना जालना भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या संगीत समारोहाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांच्या हस्ते व मराठवाडा नाट्य परिषद, जालनाचे अध्यक्ष कुमार देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.