शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
3
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
4
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
5
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
6
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
7
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
8
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
9
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
10
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
11
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
12
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
13
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
14
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
15
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
16
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
17
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
18
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
19
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
20
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा राज्यात अव्वल

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

उस्मानाबाद : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अव्वल आल्याचे सांगत दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून

उस्मानाबाद : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अव्वल आल्याचे सांगत दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून आरोग्य यंत्रणेने तळागळातील लोकांपर्यंत सेवा पुरवावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील यांनी केले.
डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्कार विजेते आणि गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती दत्ता मोहिते, हरिष डावरे, लता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगाकवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, सदस्य रामदास कोळगे, स्मिता ननवरे, सुशिला कठारे, शामल वडणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरवर करण्यात आला.
अध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले, दोन-अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजावारा उडला होता. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे जाणाऱ्या रूग्णांची संख्या रोडावली होती. अनेक केंद्रातील शस्त्रक्रियागृह बंद असल्याने प्रसुतींची संख्याही घटली होती. मात्र कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत ढेपाळलेली आरोग्य सेवा गतिमान करण्यात यश आले. एवढेच नाही, तर जिल्हा अनेक उपक्रमामध्ये राज्यात अव्वल आला आहे. ही बाब उस्मानाबादकरांच्या दृष्टीकोनातून अभिमानाची असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीही आरोग्य विभागाकडून चांगले काम सुरू असल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रायते म्हणाले की, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेवून आरोग्य यंत्रणेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आरोग्य केंद्रातून उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर गुंड म्हणाले की, पूर्वी ज्या आरोग्य केंद्रा वर्षाला आठ ते दहा प्रसुती होत असत. तेथे आज महिन्याला २० ते २२ प्रसती होवू लागल्या आहेत. आरोग्य विभागाने हीच गती कायम ठेवत राज्यात नावलौकिक निर्माण करावा, असे आवाहन केले.
प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी प्रास्ताविक केले. मी एकटा अधिकारी काहीही करू शकत नाही. परंतु, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी भक्कम साथ दिली. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या नावलौकिकाचे सर्व श्रेय हे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जाते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
डॉ. आर. एस. खराडे, डॉ. एम. जी. पोतरे, डॉ. जी. बी. मुधोळकर, डॉ. एस. बी. यत्नाळकर, डॉ. वागतकर, एस. आर. सागर, ए. ए. राठोड, पी. टी. गंगावणे, एन. एन. बिराजदार, एन. बी. भिंगडे, के. व्ही. लोहार, एस. व्ही. कदम, आर. ए. महाजन, यु. व्ही. कुलकर्णी, एस. आर. चव्हाण, व्ही. सी. सूर्यवंशी, एस. एन. थोरात, एस. सी. लकडे, एस. एन. शिंदे, एम. डी. पाटील, पी. एम. शिंदे, एस. जी. भानवसे, सी. जे. कांबळे, नितीन काशिनाथ स्वामी, कालिंदा धनंजय कदम, मंगल प्रताप वाडीकर, सुकुमार संजय शिरगिरे, बबीता रामेश्वर कोळी, वर्षा शहाजी रितापुरे, अनिता मोहन माळी, महादेव गोपाळ माने, संजीवनी किसनसिंग राजपूत, मनिषा संतोष मेहेर, मुक्ता पद्मराज भडके, लक्ष्मी सदानंद कांबळे, अरूणा सतीश लोहार, जयमाला ठोसर, मालन शिखरे, सविता लोढे, निता शिंदे, रेषा सुरवसे, मिनाक्षी कानडे, आशा गाडे, आशा गावडे, श्रीदेवी चौरे, राणी इंगळे, प्रमिला पवार आदींचा समावेश आहे.