शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

्रग्रामीणभाग झाला निवडणूकमय!

By admin | Updated: October 9, 2014 00:36 IST

जालना : सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या अलिशान लक्झरी गाड्या... त्यातून कडक खादीत वावरणारे पुढारी व कार्यकर्ते... त्यांच्या स्वागतासह

जालना : सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या अलिशान लक्झरी गाड्या... त्यातून कडक खादीत वावरणारे पुढारी व कार्यकर्ते... त्यांच्या स्वागतासह जल्लोषात बेफान झालेले स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते...चावडीवरील कॉर्नर सभा... त्यातील आरोप-प्रत्यारोप व एकेरी भाषा... अन् धुराडे उडवीत जाणारे ताफे असे हे ग्रामीण भागातील चित्र. लोकसभा निवडणुकीपासूनच ग्रामीण भाग निवडणूकमय झाला आहे. कारण त्या निवडणुकीतील प्रचारयुध्दा पाठोपाठ जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांनी जय-पराजयाची विश्लेषने करीत तातडीने मोर्चेबांधणी सुरु केली. आळस झटकून हे मातब्बर प्रचार दौऱ्यावर गुंतले. विशेषत: सत्तारुढ असो की विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी संभाव्य आचारसंहिता ओळखून आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेकरीता कार्यक्रमांचा धुमधडाका सुरु केला. भूमीपूजने, उद्घाटने, लोकार्पण सोहळे रंगू लागले. एकाका दिवशी किमान अर्धा डझन कार्यक्रमांची कार्यक्षेत्रात रेलचेल होती. निवडणुकीचा कार्यक्रम पाठोपाठ आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कार्यक्रमांचा तो धुमधडाकाथांबला खरा, परंतू तेथून प्रचाराचा धुराडा उडाला. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शक्तीप्रदर्शनांपासून ते आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यांपर्यंत खेडोपाडी, वाडीतांडे या प्रचार युध्दाने अक्षरश: गजबजून गेली आहेत. मातब्बर मंडळींनी गेल्या चार महिन्यांपासून तर निवडणुक रिंगणात नव्याने उतरलेल्या नवख्यांनी गेल्या आठ पंधरा दिवसांतच सर्व शक्तीनिशी ग्रामीण भागात धुराडा उडविला आहे. महायुती व आघाडी संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच दुरंगी लढती चौरंगी किंवा बहुरंगी झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील त्या-त्या पक्षांच्या अडगळीत पडलेल्या स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. तेथूनच ते कपड्यांवरील धुळ झटकून कामास जुंपले. ते आजपर्यंत. येत्या आठ दिवसात तर हे कार्यकर्ते त्या-त्या गावांमधून प्रचाराचा कळस गाठतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. तालुका स्थानापासून खेडीपाडी व वाडीतांड्यांवर सद्यस्थितीत वॉर्डनिहाय गाठीभेटी, कॉर्नर सभा, बैठकांना उत आला आहे. गल्ली बोळातून ध्वनीक्षेपकावरुन कर्नकर्कश प्रचार करणाऱ्या अ‍ॅटोरिक्षा, जीपगाड्या धुमाकूळ घालत आहेत. फाट्यांवरील छोट्या मोठ्या हॉटेल्स, ढाबे गजबजून गेले आहेत. जावे त्या ठिकाणी निवडणुकीचीच चर्चा रंगली आहे. ओट्या-ओट्यांवर, कट्ट्यांवर रात्री बेरात्रीपर्यंत उमेदवारांनी केलेल्या युक्त्या, क्लुप्त्या व खेळलेल्या डावपेचांच्याच गप्पा रंगल्या आहेत. त्यामुळे वातावरण बदलून गेले आहे. येत्या आठ दिवसात वातावरण पेटेल. (प्रतिनिधी)