शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

‘हसवाफसवी’ नाटकाने सखी खुश

By admin | Published: December 23, 2014 12:34 AM

औरंगाबाद : प्रसिद्ध गायक नट कृष्णराव हेरंबकर यांचा न्यू ऋग्वेदी हॉल सार्वजनिक उत्सव मंडळाने सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यात सत्कारमूर्तींनाच येण्यास उशीर होतो.

औरंगाबाद : प्रसिद्ध गायक नटकृष्णराव हेरंबकर यांचा न्यू ऋग्वेदी हॉल सार्वजनिक उत्सव मंडळाने सत्कार आयोजित केला होता. या सोहळ्यात सत्कारमूर्तींनाच येण्यास उशीर होतो. उशीर का होतो, त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी काय काय करावे लागते याचे विनोदी चित्रण दिलीप प्रभावळकर लिखित ‘हसवाफसवी’ या धमाल नाटकाच्या रूपाने सखींसमोर सादर करण्यात आले. या सोहळ्यातील विनोदी संवादांनी हास्याचे कारंजे फुलले.लोकमत सखी मंचतर्फे सखी मंच सदस्यांसाठी जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित ‘हसवाफसवी’ या नाटकाचा सखींनी मनसोक्त आस्वाद घेतला. अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या नाटकात एक नाही, दोन नाही, तब्बल सहा विनोदी भूमिका साकारल्या. ‘हसवाफसवी’ नाटकाच्या दोन्ही अंकांत वातावरण खिळवून ठेवले. दिलीप प्रभावळकरांनी इतिहास घडवलेली सहा पात्रे पुष्कर श्रोत्रींनी हुबेहूब सादर करून रसिकांची दाद मिळवली. यात चिमणराव, प्रिंन्स वाटूकिंग, चिंग्पो अ‍ॅलन, नाना पुंजे, सहा मुलांची आई पूर्वी श्रोत्री आणि शेवटी कृष्णराव हेरंबकर या पात्रांचा समावेश आहे. यातील स्त्री पात्र पूर्वी श्रोत्रीला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. माहेरवाशीण असलेली पूर्वी आपल्या पती आणि मुलांना परदेशात कशी सांभाळते, तसेच पुष्करची जुळी बहीण असूनही त्याच्यापासून दूर कशी या संदर्भातील सविस्तर माहिती ‘तिने’ विनोदी ढंगात मांडली. सत्कार सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या व्यासपीठावर वाघमारे आणि मोहिनी यांची शब्दांची उत्कृष्ट जुगलबंदी रसिकांना हसवण्यास भाग पाडत होती. ताण, कामाचा व्याप विसरून या जुगलबंदीच्या विनोदावर सखी मनसोक्त हसत होत्या. त्यांनी टाळ्या आणि हशा यांच्या साहाय्याने कलाकारांचा उत्साह द्विगुणित केला. या नाटकातून पुष्कर श्रोत्री यांच्या नसान्सात भिनलेला अभिनय दिसून आला. कृष्णराव हेरंबकर यांचा चाहता असलेला चिमणराव घरातून खोटे बोलून सत्कार समारंभासाठी उपस्थित कसा राहतो याचे उत्कृष्ट सादरीकरण त्यांनी केले. त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिकांनी रसिकांच्या मनात घर केले. त्यात कोंबडी विक्रेता, त्याचा मुलगा, चीनचा राजपुत्र, पूर्वी श्रोत्री या भूमिकांनी रसिकांसाठी ‘हसवाफसवी’चा प्रयोग खऱ्या अर्थाने सफल झाला.यावेळी सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे, कमिटी मेंबर गीता अग्रवाल, पद्मजा मांजरमकर, नीता पानसरे आदींची उपस्थिती होती.