शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

दोन इमारतींच्या स्लॅबवर हातोड्यांचे घाव

By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई न.प.च्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी आलोकनगरात गट नं. १५३ मधील इमारतीचे दोन मजले, तर छत्रपतीनगरातील गट नं. १३७ मधील इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब खिळखिळे केले.

औरंगाबाद : सातारा- देवळाई न.प.च्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी आलोकनगरात गट नं. १५३ मधील इमारतीचे दोन मजले, तर छत्रपतीनगरातील गट नं. १३७ मधील इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब खिळखिळे केले. पंधरा दिवसांत ३० कामांवर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली आहे. गट नं. १५३ मधील अभिजित येवले व गट नं. १३७ मधील भूषण गायकवाड यांच्या प्लॉट ४२ मधील पाच मजली इमारतीवरील दोन मजले चार ब्रेकर आणि ४४ हातोड्यांच्या माऱ्याने खिळखिळे केले आहेत. कारवाई सुरू असताना पथकाला पाहून अनेक जण स्वत:हून बांधकाम काढून घेण्याचे नाटक करीत आहेत, तर कोर्टाच्या ‘जैसे थे’च्या आदेशाच्या नावाखालीही पथकासमोर ‘भुलभुलैया’ उभा केला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. २५ पैकी किती लोकांनी १० लाख भरले आहेत, अशी विचारणा केली असता, फक्त ९ लोकांनीच पैसे भरले असल्याचे समजले. उर्वरित याचिकाकर्त्यांना दुपारपर्यंतची मुदत दिली असून, त्यावर कोर्ट दुपारनंतर काय निर्णय घेते याकडे सातारावासीयांचे लक्ष लागून होते.सातारा, देवळाई परिसरात ३५० जणांना नोटिसा देऊनही गुरुवारपर्यंत फक्त ९ लोकांनीच दहा लाख रुपये जमा केले होते, त्यांच्याकडून अजून कागदपत्रांची सविस्तर माहितीही मागितली असून, परवानगी तपासण्यात येणार असल्याचे समजते. उर्वरित अतिरिक्त बांधकामांवर अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई चालू राहणार आहे. एफएसआयचा नियम धुडकावून लावीत नागरिकांचा जीव धोक्यात घालून सदनिका विकण्याचा घाटही बिल्डरांनी लावलेला आहे. जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्या आणि त्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या इमारतींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अचानक एखाद्या इमारतीत आग लागल्यास त्या ठिकाणी अग्निशामक विभागाची गाडी जाईल कशी, असा सुरक्षिततेचा विषय समोर आहे, असे प्रशासक विजय राऊत, मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी सांगितले.