मनपाकडून विविध अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:05 IST2021-07-21T04:05:22+5:302021-07-21T04:05:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील कुतुबपुरा पुष्पाबाई भीमराव राऊत यांनी घराजवळील लहान गल्लीत बांधकाम करून रस्ता बंद केला. ...

Hammer on various encroachments from NCP | मनपाकडून विविध अतिक्रमणांवर हातोडा

मनपाकडून विविध अतिक्रमणांवर हातोडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील कुतुबपुरा पुष्पाबाई भीमराव राऊत यांनी घराजवळील लहान गल्लीत बांधकाम करून रस्ता बंद केला. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाने भिंत पाडली. त्याचप्रमाणे सिडको एन-८ येथील नवभारत हाैसिंग सोसायटी येथील विकास रामसिंग जाधव यांनी ३० बाय ४० आकारात अनधिकृत बांधकाम केले. महापालिकेकडून हे बांधकाम थांबविण्यात आले. धनमंडी नारळीबाग येथे शारदा दिलीप राऊत नाल्याजवळील जागेवर बांधकाम करीत असल्याची तक्रार मनपाला प्राप्त झाली. या ठिकाणचे बांधकाम थांबविले. याच परिसरात बाली ज्ञानेश्वर गवळी यांनी दहा फुटाच्या रस्त्यात शौचालय बांधून रस्ता बंद केला. पुढील कारवाईसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरिक्षक सय्यद जमशीद, रामेश्वर सुरासे, रवींद्र देसाई, मझहर अली, सागर श्रेष्ठ यांनी केली.

Web Title: Hammer on various encroachments from NCP