शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
3
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
4
बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (video)
5
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
6
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
7
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
8
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
9
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
10
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
11
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
12
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
13
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
14
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
15
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
16
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
17
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
18
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
19
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
20
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांची पळविली पर्स

By admin | Updated: May 16, 2014 00:19 IST

जिंतूर : मुंजीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या भाग्यश्री अवचारे या महिलेच्या पर्समधील दागिने बसमधून अज्ञात चोरट्यांनी पळविले.

जिंतूर : मुंजीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या भाग्यश्री अवचारे या महिलेच्या पर्समधील दागिने बसमधून अज्ञात चोरट्यांनी पळविले. या दागिन्यांची किंमत ५ लाख ४८ हजार ५०० रुपये एवढी आहे. ही घटना ११ मे रोजी घडली. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात १४ मे रोजी रात्री गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती अशी की, बोरी येथील भाग्यश्री अवचारे ह्या धुळे-मालेगाव येथे मुंज कार्यक्रमासाठी जिंतूर येथून नांदेड- औरंगाबाद या बसमध्ये बसल्या होत्या. साधारणत: शहरापासून १० ते १२ कि.मी. अंतरावर गेल्यानंतर महिलेला तिच्या हॅन्डपर्सची चैन उघडल्याचे दिसले. त्यांनी पर्समध्ये हात घालून पाहिला असता पांढर्‍या रुमालात गुंडाळून ठेवलेले सोन्याचे दागिने पळवून नेल्याचे लक्षात आले. यामध्ये तीन तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत ९० हजार रुपये), पाच तोळ्याच्या बांगड्या (किंमत १ लाख ५० हजार रुपये), एक तोळ्याचे गंठण (किंमत ३० हजार रुपये), चार तोळ्याच्या पाटल्या (१ लाख २० हजार रुपये), ५ ग्रॅम सोन्याचे झुमके (किंमत १५ हजार रुपये), सोन्याचे दोन लॉकेट (प्रत्येकी १ तोळा किंमत ६० हजार रुपये), सोन्याची अंगठी (५१ हजार रुपये), ७ ग्रॅमची अंगठी (२१ हजार रुपये) व रोख ५ हजार रुपये असा एकूण ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला. संबंधित महिलेने याबाबतची तक्रार जिंतूर पोलिस ठाण्यात १४ मे रोजी दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)