शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

हज हाऊसचे काम निकृष्ट !

By admin | Updated: May 1, 2015 00:51 IST

बीड : शहरातील किल्ला मैदान भागातील जामा मस्जिदीच्या शेजारी असलेल्या हज हाऊसच्या बांधकाामसाठी एका कंस्ट्रक्शन कंपनीने २५ लाख तर अल्पसंख्यांक फंडातून

बीड : शहरातील किल्ला मैदान भागातील जामा मस्जिदीच्या शेजारी असलेल्या हज हाऊसच्या बांधकाामसाठी एका कंस्ट्रक्शन कंपनीने २५ लाख तर अल्पसंख्यांक फंडातून ८९ लाख रूपये खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र येथे अनेक असुविधा असल्याचा आरोप अब्दुल खालेक पेंटर व समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुसा खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. शहरातील किल्ला मैदान परिसरात जामा मस्जिदलगत हज हाऊससाठी तळमजल्यात एक इमारत तयार करण्यात आलेली आहे. या इमारतीचे पूर्ण खोदकाम, आरसीसीचे कॉलम, चारही बाजुच्या भिंती व बेसमेंटचे काम आधी जामा मस्जिद कमिटीने स्वखर्चाने तयार केलेले असल्याचा उल्लेख खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केलेला आहे. पुढे म्हटले आहे की, सन २०१४ मध्ये हज हाऊसची निविदा काढण्यात आली. सदरील कामाचे कंत्राट एका कंस्ट्रक्शनला देऊन काम करण्यात आले.उद्घाटनावेळी हज हाऊसच्या इमारतीच्या नियोजित प्लॅनमध्ये सदरील इमारत दोन मजली दाखवली असुन कामासाठीचा निधी २५ लाख दाखविण्यात आला आहे. अंडर ग्राऊंड खोदकाम व बेसमेंटच्या कॉलमचे काम मस्जिद कमिटीने केले आहे. ठेकेदाराने हेच काम पूर्ण केले आणि केवळ अंडर ग्राऊंडचे काम करुन बील उचलले आहे. हे सर्व काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही खालेक पेंटर यांनी केला आहे. अल्पसंख्यांक फंडाचाही पैसा वापरलासन २०१३-१४ मध्ये अल्पसंख्यांक विभागामार्फत याच हज हाऊस बांधकामासाठी एका कंत्राटदाराने ८९ लाख ५ हजार रुपयांचा निधी उचलला असल्याचा आरोप मुसा खान यांनी केला आहे. सदरील कामाचे ‘वर्क डन’ असा उल्लेख नगर परिषदेला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रात करण्यात आला असल्याचे खान म्हणाले. त्या कंस्ट्रक्शनला आमदार फंडातील २५ लाख रुपये तर अल्पसंख्यांक फंडातून ८९ लाख ५ हजार रुपये बांधकामासाठी वापरले असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, हज हाऊसमध्ये यात्रेकरुसाठी कोणत्या सुविधा नसून केवळ एक हॉल तयार करुन कामाला अंतिम स्वरुप दिले असल्याचा आरोप मुसा खान यांनी केला आहे. (प्रतिनिधी)महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती, औद्यागिक नगर अधिनियम १९६५ चे कलम ३१३ प्रमाणे बीड नगर परिषद बरखास्त करण्याची शासनास शिफारस करण्याची मागणी खालेक पेंटर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.४त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांच्यामार्फत प्राथमिक अहवाल मागविला होता. ४त्यांनी खालेक पेंटर यांनी मांडलेल्या मुद्यानुसार अहवालावर सविस्तर चौकशी करुन आवश्यकता असल्यास अभिलेखे तपासून चौकशी अहवाल सादर करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती.४त्यात हज हाऊसच्या बांधकामासाठी वापरलेल्या निधीचा उल्लेख करण्यात आला आहे. एक महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते मात्र शनिवारपर्यंत अहवाल दाखल नव्हता, असे खालेक पेंटर म्हणाले.