शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हातही गुरुजींची वारी निघाली विद्यार्थ्यांच्या दारी...

By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST

बीड : नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी गुरूजींना पुढील वर्षातील विद्यार्थी संख्येसाठी घरोघरी भटकावे लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

बीड : नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. सुट्यांचा आनंद घेण्याऐवजी गुरूजींना पुढील वर्षातील विद्यार्थी संख्येसाठी घरोघरी भटकावे लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.जिल्ह्यात २९३१ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. इंग्रजी शाळा मोठमोठ्या जाहिराती करून विद्यार्थी आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांसमोर स्वत:च्या नौकरीचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच मराठी शाळांपुढे विद्यार्थी संख्या वाढविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे नियमानुसार विद्यार्थी संख्या राहिली नाही तर आपण अतिरिक्त ठरू याची भीती शिक्षकांना वाटू लागली आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन नवीन विद्यार्थी शोधण्याचे काम शिक्षक करत असल्याचे चित्र आहे.विश्वास संपादनाचे आव्हानशिक्षक घरोघरी जाऊन पालकांची भेट घेऊन त्यांना आपल्या शाळेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्या पालकांची परिस्थिती जेमतेम आहे त्यांची मुले मराठी शाळेत पाठविण्यास तयार होत आहेत.मोजक्याच शाळेत भरपूर विद्यार्थी शहरातील मोजक्याच खासगी व मराठी शाळांमध्ये भरपूर विद्यार्थी संख्या दिसते. अतिरिक्त ठरायचे नसेल तर विद्यार्थी आणल्याशिवाय पर्याय नाही, असे संस्थाचालकांकडूनही शिक्षकांना सांगितले जात आहे. सुट्ट्यांचा आनंद घेण्याऐवजी शिक्षकांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)