शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप जोडणीला मिळणार गती

By admin | Updated: March 23, 2016 01:09 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने मंगळवारी राज्याचे कार्यकारी संचालक सी.एच. येरमे यांनी आढावा बैठक घेऊन कंत्राटदारांबरोबर अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले होते. कृषीपंपधारकांना वीज प्रवाहात आणण्याकरिता साठ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी बीड विभागाला मिळाली होती. यामधून ८ हजार पाचशे कृषीपंपाची जोडणी करण्याचे विभागाला उद्दीष्ट पैकी अद्यापपर्यंत केवळ ४ हजार कृषीपंप जोडण्यात आले आहेत. मार्च अखेरपर्यंतच योजनेचा कालावधी असून उर्वरीत १५ दिवसांत कामे कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. यासंबंधी लोकमत ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत खुद्द राज्याचे कार्यकारी संचालकांनी या कामांचा आढावा विभागीय कार्यालयात घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता रतन सोनुले उपस्थित होते. योजना पूर्णत्वाला कालावधी लागला तरी चालेल मात्र शेतकऱ्यांच्या हेतूने कृषीपंप जोडणीची योजना सुरूच राहणार असल्याचे येरमे यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले. तर अद्यापपर्यंत कामेच सुरू केलेली नाहीत अशा कंत्राटदारांना त्यांनी तंबी दिलेली आहे. कृषीपंप जोडणीची कामे दर्जात्मक होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या.वायरमनचेही ऐकले गाऱ्हाणे स्थानिक पातळीवर काम करीत असताना संरक्षणात्मक साहित्याची पुर्तता केली जात नाही. उपविभागीय कार्यालयात सोई-सुविधा नसल्याने तारांबळ होत आहे. शिवाय आर्थिंगकरिताही पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वायरमन यांनी कार्यकारी संचालक येरमे यांच्या कडे केल्या. साहित्य पुरविण्याविषयी अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांना सूचना केल्या.