शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्याही तक्रारीचे निवारण होणार

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

केवल चौधरी, जालना जालना : कायद्याचा बडगा आणि वरिष्ठांचा जाच यामुळे कायम तणावाखाली असलेल्या पोलिसांनाही आता आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

केवल चौधरी,  जालनाजालना : कायद्याचा बडगा आणि वरिष्ठांचा जाच यामुळे कायम तणावाखाली असलेल्या पोलिसांनाही आता आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. निनावी नव्हे तर कायदेशीर तक्रार करून न्याय मागण्याचा हक्क पोलिसांना प्राप्त झाला आहे. गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला असून पोलीस दलात अशा प्रकारचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. १० सप्टेंबर २०१४ रोजी गृह मंत्रालयाने राज्य सुरक्षा आयोग व पोलिस तक्रार प्राधिकरणाची निर्मिती करून त्यासाठी पदनिर्मिती करण्यासही शासनाने संमती दिली आहे. समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी अवघे आयुष्य खर्ची घालणाऱ्या पोलिसांना कधीच स्वत:वरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची संधी प्राप्त होत नव्हती. २२ सप्टेंबर २०१० साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेऊन अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. वास्तविक पाहता शासनाने १५ जानेवारी २०१४ रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आचार संहिता लागू होण्याच्या उंबरठ्यावर ही अंमलबजावणी होत असल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पोलिसांना आपल्या तक्रारी मांडता येणार असून त्यांच्या तक्रारींचे निवारणही होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. ६ कोटींचा खर्चयासाठी १३३ नियमित पदे निर्माण करण्यात आली असून बाह्ययंत्रणेद्वारे २४ पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ३७ लाख ९० हजार रूपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी राज्य व विभागस्तरावर कार्यलये सुरू करण्यात येणार आहेत.