औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीतील अंतिम खर्च सादर करण्यासाठी मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील २७ पैकी २६ उमेदवारांनी वरील मुदतीत त्यांचा खर्च सादर केला आहे. त्यानुसार २६ उमेदवारांनी मिळून या निवडणुकीत केवळ सव्वा कोटी रुपयांचा खर्च केल्याचे दाखविले आहे. या मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयोगाकडून १५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने यावेळी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ७० लाख रुपये ठरवून दिली होती. प्रत्येक मतदारसंघात खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खर्च नियंत्रण समिती कार्यान्वित करून तिच्यामार्फत उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब ठेवला जात होता. शिवाय उमेदवारांनाही वेळोवेळी समितीकडे खर्च सादर करणे बंधनकारक केले होते. मतमोजणीच्या दिवशीचा खर्च जोडून अंतिम विवरणपत्र सादर करण्यास मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता. या मुदतीत २७ पैकी २६ जणांनी विवरणपत्र सादर केले आहे, असे नियंत्रण कक्षाचे प्रमुख विलास जाधव यांनी सांगितले. शॅडो रजिस्टरमधील खर्चाशी टॅलीउमेदवारांनी सादर केलेल्या अंतिम खर्चाची तपासणी करण्यासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक शिशिर धमेजा हे रविवारीच औरंगाबादेत दाखल झाले आहेत. निवडणूक काळात खर्च नियंत्रण कक्षातील अधिकारी स्वत:ही उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवून त्याचा हिशोब ठेवत होते. प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाची नोंद शॅडो रजिस्टरमध्ये केली जात होती. आता उमेदवारांनी अंतिम विवरणपत्रात सादर केलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरमध्ये अधिकाऱ्यांनी स्वत: नोंदविलेला खर्च यांची टॅली करून बघितली जाणार आहे. त्यानंतर येत्या चार ते पाच दिवसांत याविषयीचा अहवाल आयोगास सादर केला जाईल.कोणाचा खर्च कितीचंद्रकांत खैरे - ५० लाख ६६ हजारनितीन पाटील - ३६ लाख २८ हजारइंद्रकुमार जेवरीकर - ७ लाख ९० हजारसुभाष लोमटे - १७ लाख ६१ हजारसदाशिव गायके - ६ लाख ३५ हजार
सरकारचा खर्च झाला १५ कोटी रुपये
By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST
औरंगाबाद : लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीतील अंतिम खर्च सादर करण्यासाठी मतमोजणीनंतर महिनाभराचा अवधी देण्यात आला होता.
सरकारचा खर्च झाला १५ कोटी रुपये
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}