शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिभावाचे मंगलमय सूर

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

पैठण : भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली.

पैठण : मुखी विठुनामाचा गजर, हातात भगवी पताका, भानुदास-एकनाथचा जयघोष, डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर बुक्का अशा वेशातील वारकऱ्यांच्या उपस्थितीने आज पैठणनगरी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गजबजून गेली. भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घालीत लाखो भाविकांनी आज गोदास्नान करीत नाथांचे दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी नाथ मंदिरात भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. वारकऱ्यांच्या मांदियाळीने पैठणनगरीत भक्तिभावाचे मंगलमय सूर दिवसभर निघत होते.पहाटेपासूनच विविध वाहनांनी व दिंड्यांसह हजारो भाविकांचे शहरात आगमन सुरू होते. शहरातील सर्व धर्मशाळा, मठ आदींमध्ये हे भाविक व वारकरी मुक्कामी थांबले होते. भाविकांचे लोंढेच्या लोंढे शहरात दाखल होत होते. आज पहाटेपासून नाथ मंदिरापाठीमागील मोक्षतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकमल तीर्थावरील गोदावरीच्या घाटावर पवित्र स्नानासाठी महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. पहाटेपासून सुरू असलेले गोदास्नान दिवसभर सुरूच होते. गोदेचे स्नान करून, नाथांचे दर्शन घेऊन वारकरी प्रसन्न मनाने परत फिरत होते. जे भाविक पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, ते भाविक पैठणला येऊन नाथांचे दर्शन घेतात. आषाढीची ही परंपरा असल्याने आज लाखो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले. दिवसभरात दीड लाख भाविकांनी नाथ मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली, असे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.पैठण वारीतूनही विठोबाच्या भेटीचे सुख मिळते, असे अनेक वारकऱ्यांनी पैठणवारीचे महत्त्व सांगितले. आषाढी वारीसाठी आज औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, परभणी आदी जिल्ह्यांतून वारकरी आले होते.वारकऱ्यांना सुरळीत दर्शन घेता यावे म्हणून नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संजय वाघचौरे, कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी, आय.पी.एस. पोलीस अधिकारी दीक्षित गेडाम, ए.पी.आय. केंद्रे, फौजदार अंकुश पाटोळे, संपत पवार आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. श्री एकनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)पावसाचे आगमन झाल्याने आनंद द्विगुणितगेल्या दोन दिवसांपासून पैठण शहरासह तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते, परंतु पाऊस आला नव्हता. आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांनी नाथांना पावसासाठी साकडे घातले. सायंकाळी खरोखर पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांचा आनंद द्विगुणित झाला. हजारो भाविकांनी नाथ महाराज व विठुरायाचा जयघोष करीत मंदिर परिसर दणाणून सोडला. भर पावसातही दर्शन घेण्यासाठी भाविकात उत्साह होता.