‘चांगले अधिकारी तरी पळवू नका’

By Admin | Updated: February 9, 2016 00:31 IST2016-02-09T00:17:57+5:302016-02-09T00:31:31+5:30

औरंगाबाद : साईचे विभागीय केंद्र, ‘आयआयएम’ नागपूरला पळविण्यात आले. आता महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना विदर्भात नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

'Good officials do not run away' | ‘चांगले अधिकारी तरी पळवू नका’

‘चांगले अधिकारी तरी पळवू नका’


औरंगाबाद : साईचे विभागीय केंद्र, ‘आयआयएम’ नागपूरला पळविण्यात आले. आता महापालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना विदर्भात नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्रेकर यांची बदली करू नये, महापालिकेतच त्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा. किमान चांगले अधिकारी तरी मराठवाड्यातून पळवू नयेत, या मागणीसाठी उद्योग, व्यापार क्षेत्राबरोबरच जनता विकास परिषदेसारख्या संघटना एकवटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्याकडे या मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
केंद्रेकर यांची बदली करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए), मसिआ, मराठवाडा जनता विकास परिषद, सिटीजन्स रिस्पॉन्स टीम, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एमआयपीएम), ‘आयसा’, वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशन, जिल्हा व्यापारी संघ, क्रेडाई, औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन आदी संघटना एकत्र आल्या असून, केंद्रेकर यांच्या संभाव्य बदलीला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

Web Title: 'Good officials do not run away'