शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यात सोने, वाहन अन् प्लॅटही !

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

संजय तिपाले , बीड हौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. लग्नसोहळ्यात वधू-वरांचे लाड पुरविताना कुठलीही कमी राहू नये, याची खबरदारी घेतली जाते.

संजय तिपाले , बीडहौसेला मोल नसते असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. लग्नसोहळ्यात वधू-वरांचे लाड पुरविताना कुठलीही कमी राहू नये, याची खबरदारी घेतली जाते. हौसेपायी पैशांची उधळपट्टी करण्याचा ‘हायप्रोफाईल’ कुटुंबांमधील ‘ट्रेंड’ आता दुष्काळी बीडमध्येही आला आहे. हुंड्यात रोख पैशांऐवजी सोने, वाहन, प्लॅट अन् इतर महागडे गिफ्ट देण्याची नवी पद्धत रुढ होते आहे.जिल्ह्यात सध्या लग्नसराईची धूम सुरु आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे काही कुटुंबांमध्ये ‘यंदा कर्तव्य नाही’ चा सूर आहे. काहींनी लग्नसोहळ्यांचे मुहूर्त पुढे ढकलेले आहेत. त्यामुळे खरेदीवर परिणाम झाला असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, श्रीमंत कुटुंबातील मंडळींना मात्र दुष्काळाची झळ नाही.पैसा खर्च झाला तरी सोहळा भन्नाट झाला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणाऱ्यांचीही कमी नाही. अगदी निमंत्रण पत्रिकांपासून ते शामियाना व जेवणातील मेनूपर्यंत ‘हटके’ देण्याचा प्रयत्न काही वधूपिता करत असतात. पत्रिकांमध्येही डिजीटल लुक तेजित आहे. साध्या पत्रिकांची किंमत २ ते ५ रुपयांपर्यंत आहे. डिजीटल व आकर्षक बनावटीच्या पत्रिका १० ते २०० रुपयांपर्यंत मिळतात. गरीब कुटुंंबातील लग्न सोहळ्यातही आता ५ ते १० रुपयांपर्यंतची पत्रिका छापून घेतल्या जातात. श्रीमंतांमध्ये तर लक्षवेधी व उत्तम प्रकारच्या पत्रिका छापून घेण्याची स्पर्धाच असते. हुंंडा नको, मुलगी द्या!काही समाजांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने घटते आहे. त्यामुळे नोकरदार वरांनाही वधू मिळणे कठीण बनत आहे. हुंडा नको, मुलगी द्या... असा सूर आवळून काही वरपिता लग्नखर्चही स्वत:च उचलत असल्याचे दिसते.परिवर्तनवादी विचाराचे वधूवर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्राधान्य देत आहेत. असे विवाह प्रामुख्याने ‘कोर्ट मॅरेज’ या संकल्पनेखाली होत असल्याचे दिसून येत आहे.