१७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय: जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:24 IST2025-09-08T13:24:18+5:302025-09-08T13:24:48+5:30

'विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे,' मराठा समाजाला शांत राहण्याचा मनोज जरांगेंचा सल्ला

Give Kunbi certificate by September 17, otherwise big decision in Narayangadh Mela: Manoj Jarange direct warning to the government | १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय: जरांगेंचा इशारा

१७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अन्यथा नारायणगड मेळाव्यात मोठा निर्णय: जरांगेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: हैदराबाद संस्थानच्या गॅझेटिअरनुसार मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी  प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करा, अन्यथा १७ सप्टेंबर रोजी  नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात आम्हाला भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि. ८ ) राज्यसरकारला दिला. 

मागील सात दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद संस्थान लागू करण्याचा निर्णय घेतला. या गॅझेटिअरनुसार आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाज आणि मल्हार कोळी समाजाकडून होत असेल तर शासनाने या दोन्ही समाजालाही लाभ द्यावा, आम्ही काही येवलावाल्याप्रमाणे नाही, असा टोला त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.

...तर आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल
हैदराबाद संस्थापनप्रमाणे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी, हुलकावणी देता की, काय असे आम्हाला वाटायला नको, प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी २४ तास कामाला लावा आणि प्रमाणपत्र देण्यास सुरवात करा. १७ सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया सुरू करा,  गावपातळीवर समितीला मनुष्यबळ द्या, अन् कामाला लावा. हैदराबाद संस्थान जिथपर्यंत होते तिथपर्यंत काम करा, नसता आम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. राजकीय नेत्यांना आमच्याकडे येणे बंद करावे लागेल, असा इशारा जरांगे यांनी राज्यसरकारला दिला. 

सगळे मराठे ओबीसी झाले
कोणाचे ऐकून हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्या. गरीबांच्या लेकरांनी चटणी भाकर घेऊन हे आरक्षण मिळवलं आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळे मराठे ओबीसी झाले. हा जी.आर वाचून अनेकांना झोपा येईना. मराठ्यांनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे. सगळे ओबीसीमध्ये जाऊ द्या मग मोठा आनंद व्यक्त करू. सध्या थोडं सयमाने घ्या, असा सल्लाही त्यांनी समाजाला दिला. 

दसरा मेळाव्यात भूमिका घेणार
तातडीने १७ सप्टेंबरपर्यंत हैदराबाद संस्थानच्या गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करा, अन्यथा नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात भूमिका घ्यावी लागेल,असा इशारा जरांगे यांनी राज्यसरकारला  दिला. प्रत्येक तालुक्यातील नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या. नारायणगड येथे दसरा मेळावा होईल.

Web Title: Give Kunbi certificate by September 17, otherwise big decision in Narayangadh Mela: Manoj Jarange direct warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.