शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

‘मुलींनी आत्मविश्वासाने अन्यायाला सामोरे जावे’

By admin | Updated: June 29, 2014 00:36 IST

बीड: दिवसेंदिवस महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत आहे.

बीड: दिवसेंदिवस महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत आहे. कितीही कायदे काढले आणि कितीही कठोर कारवाया केल्या तरी विकृत दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहणाऱ्यांवर काहिही परिणाम होणार नाही, यासाठी आपण स्वत:चा आत्मविश्वास जागरूक करावा, आत्मविश्वास हाच माणसाच्या जवळचा खरा मित्र आहे, आपल्यात जर आत्मविश्वासाची शक्ती असेल तर आपण कोणत्याही घटनेला जिद्दीने लढू शकतो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. संगीता धसे यांनी केले.येथील राजस्थानी विद्यालयात जनाधार प्रतिष्ठाणच्या वतीने ‘महिला सबलीकरण व जागर जाणीव अभियान’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. संगीता धसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सचीव रामेश्वर कासट हे होते तर पेठ बीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी.एस.सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक रामलाल छाजेड, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री, महिला गस्त पथकाच्या मनीषा राऊत यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.मुलींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. याला जशास तसा जवाब देण्यासाठी प्रत्येक मुलींनी स्वत:च रक्षण करायला शिकले पाहिजे. तेवढी क्षमता आपल्यात ठेवली तर आपण कोणत्याही पुरूषाशी तोंड द्यायला उभ्या राहू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी उपस्थित मुलींना दिला. ंआई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे कुठलेही वर्तन करू नका, असा सल्ला देत त्यांनी आई-वडिलांशीच घट्ट मैत्री करा असे सांगितले. यावेळी पोनि. सोनवणे, गस्त पथकाच्या मनीषा राऊत यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी गस्त पथकाच्या रंजना सांगळे, तन्वीर सय्यद, रमा भालेराव, प्रतिष्ठाणचे विनय मंत्री, ऋषी वर्मा, अक्षय मालपाणी, ओंकार पंडीत, अखील बुंदीले यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अनुप मंत्री, सूत्रसंचालन अभिजीत गिरी तर आभार अक्षय बनसोडे यांनी मानले. हेल्पलाईन क्रमांकाच्या पत्रकाचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)