शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतमालाला योग्य भाव मिळावा’

By admin | Updated: June 18, 2014 01:39 IST

अंबाजोगाई: शेतीमालास योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होईल.

अंबाजोगाई: शेतीमालास योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची आर्थिक सुधारणा होईल. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार पाशा पटेल यांनी केली.मानवलोकतर्फे अंबाजोगाईसह केज तालुक्यातील गारपीटग्रस्त अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांना खते व बियाणांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी अरविंदराव गोरे होते. डॉ. द्वारकादास लोहिया, कार्यवाह अनिकेत लोहिया, सहकार्यवाह आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.मागील दोन महिन्यापूर्वी आलेली पिके गारपिटीमुळे जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून योग्य मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असेही पटेल यांनी सांगितले. तर गोरे म्हणाले, प्रतिकूल परिस्थिती असली तरी काम करण्याची इच्छाशक्ती लागते. डॉ. लोहिया म्हणाले, शेतकऱ्यांसाठी याच अनुदानातून विविध ओढ्यांत खड्डे घेऊन जमिनीतील पाणीपातळी वाढविणे व शंभर गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकण्याचे काम आपण करणार आहोत, असे सांगितले. किरण दामोशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी गीत सादर केले. संचालन प्रा. रमा पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार चिंतामण कुलकर्णी यांनी मानले. यावेळी शेतकऱ्यांसह प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)