शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटूनही अनुदान मिळेना

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता अनुदानही जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनुदान पदरी पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पराकष्ठा केल्या. तरीही जिल्ह्यातील तब्बल २ लाख २८ हजार ४८८ शेतकरी हे अनुदान पासून वंचितच राहिले आहेत.खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीपासून पाण्याची कमतरता तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा या दुहेरी फटक्यामुळे खरीप हातचा गेला होता. प्रशासनाकडून शेतकऱ्यांविषयी सहानभुती दाखवत अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार ५० टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४५०० रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार होती. अनुदान जाहिर झाल्यापासून शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनुदानाच्या रकमेसाठी प्रथम शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये खाते उघडण्याचे अनिवार्य करण्यात आले.त्याकरिता शेतकऱ्यांना बॅकेच्या दारी खेटे मारावे लागत आहेत. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीदरम्यान मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने काम चालु असून आठ दिवसांच्या आत अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एकीकडे उर्वरित शेतकऱ्यांच्या खरीप अनुदानासाठी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या मध्यावधीत बळीराजाला बियाणांसाठी पैशाची गरज आहे. गरजेपोटी शेतकरी बॅकांकडे हेलपाटे मारत आहे. आता खरिपाचे अनुदान मिळाले नाही तर खाजगी सावकाराचा सहारा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. म्हणजेच पहिले पाढे पंच्चावंन्न अशा कात्रीत जिल्ह्यातला शेतकरी सापडला आहे.