गांजा तस्कर गजाआड

By Admin | Updated: February 9, 2016 00:30 IST2016-02-08T23:55:53+5:302016-02-09T00:30:23+5:30

वडवणी : परळीहून बीडकडे भरधाव जाणारी इंडिका रात्रीच्या वेळी वडवणी पोलीस गस्त घालत असताना शिवाजी चौकात सोमवारी पहाटे ३.३० वाजता ६ किलो गांजा व आरोपींसह पकडली.

Ganja Taskar GajaAad | गांजा तस्कर गजाआड

गांजा तस्कर गजाआड


वडवणी : परळीहून बीडकडे भरधाव जाणारी इंडिका रात्रीच्या वेळी वडवणी पोलीस गस्त घालत असताना शिवाजी चौकात सोमवारी पहाटे ३.३० वाजता ६ किलो गांजा व आरोपींसह पकडली.
वडवणी शहरातील शिवाजी चौक परिसरात रात्रीच्या वेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्यासह पोलीस गस्त घालत असताना परळीहून बीडकडे भरधाव जाणारी इंडिका (एमएच- १७ ्नस्र ४०४२) दिसली. गाडीची तपासणी करताना गाडीमध्ये गांजा आढळून आला. त्यांनी तातडीने गाडी व आतील आरोपींना ठाण्यात आणले.
सकाळी १० वाजता अमली पदार्थ गांजा व इसमाची अंगझडती घेण्याची परवानगी तहसीलदार अंनत सरवदे यांच्या आदेशानुसार मिळाल्यानंतर सपोनि संतोष साबळे, मंडळ अधिकारी पी. एच. चव्हाण, तलाठी डी. एल. भडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मुद्देमाल व आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी सहा किलो गांजा, मोबाईल २३०० रु., नगदी २७२० रु., कार २,००,००० असा एकूण दोन लाख ६५ हजार २० रुपयांचा माल पंचांसमक्ष सील करण्यात आला.
या गाडीतील चालक चाँद नवाब शेख, (वय ३५, रा. कोटला, जि. अहमदनगर), शेख सत्तार शेख (वय २०, रा.शहादर्गा कोटला) व ज्ञानदेव मल्हारी भोजने (वय ५५, रा. धनगरवाडी, जेवूर जि. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास सपोनि संतोष साबळे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Ganja Taskar GajaAad