पाटोदा : पेट्रोलपंपावर जमा झालेली तीन लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी निघालेल्या व्यवस्थापकाच्या दुचाकीचा पाठलाग करून चोरांनी धावत्या दुचाकीवरून बॅग हिसकावून पळ काढला. त्यानंतर चोरांना आडवायला गेलेल्या लोकांच्या दिशेने गोळीबार करून चोर पसार झाले. हा सिनेस्टाईल थरार बुधवारी सकाळी ११ वाजता येथील शिवाजी चौकाजवळ घडला.चुंबळी रस्त्यावर जुबेर चाउस यांचा पेट्रोल पंप आहे. पेट्रोलपंपावरील जमा रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी व्यवस्थापक शेख महेमुद व तौफीक पठाण दुचाकीवरून जात होते. याचवेळी पाठीमागून काळ्या दुचाकीवरून दोघे आले. पाठीमागे बसलेल्याने महेमुद यांच्याकडील बॅग हिसकावत शिवाजी चौकातून मांजरसुंबा रस्त्याने पलायन केले. बॅगमध्ये २ लाख ९१ हजार १८० रु होते.महेमुद व तौफीक यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भयभीत झाले होते. त्यांनी भ्रमणध्वनीवरून चाऊस यांना माहिती कळवली. जुबेर व उमर चाउस यांनी दुचाकीवरून मांजरसुंब्याच्या दिशेने पळालेल्या चोरांचा पाठलाग सुरू केला. चाऊस यांनी उंबरहिवरा येथील नागरिकांना माहिती दिली. तेथील शिवाजी नेमाने व हनुमंत खाडे यांनी रस्त्यावर ट्रक आडवा उभा करून चोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. चोरांनी आपल्याकडील पिस्तूलने नागरिकांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, नागरिक ट्रकआड दडले. गोळी हवेत गेली. या घटनेने पाटोद्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीखाली आहेत. (वार्ताहर)
पाटोद्यात चोरांचा गोळीबार
By admin | Updated: April 14, 2016 01:15 IST
पाटोदा : पेट्रोलपंपावर जमा झालेली तीन लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी निघालेल्या व्यवस्थापकाच्या दुचाकीचा पाठलाग करून चोरांनी धावत्या दुचाकीवरून बॅग हिसकावून पळ काढला
पाटोद्यात चोरांचा गोळीबार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}