शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी केले चार विश्वविक्रम

By admin | Updated: April 6, 2016 01:29 IST

औरंगाबाद : गौरव भंडारी या २६ वर्षीय युवकाने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम करून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला.

औरंगाबाद : ‘मानवी संगणक’ अशी ओळख असलेल्या गौरव भंडारी या २६ वर्षीय युवकाने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम करून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला. मंगळवारी रात्री तापडिया नाट्यगृहात विश्वविक्रम बघण्यासाठी जमलेल्या शेकडो आबालवृद्धांना ‘सुपर ब्रेन’ काय असते, याचा साक्षात्कार घडला. गौरवने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर दोन विश्वविक्रम मोडले, तर २ नवीन विश्वविक्रम स्थापित केले. या सोहळ्याचे साक्षीदार ठरले ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे, नंदकुमार घोडेले. १ ते १०० पर्यंतच्या संख्यांचे घन करण्याचा हिंमत भारद्वाज यांनी यापूर्वी केलेला २ मिनिट ४७ सेकंदांचा विक्रम मोडीत काढत गौरवने अवघ्या २ मिनिट १९ सेकंदांचा नवीन विक्रम स्थापित केला. ६ अंकी संख्येच्या गुणाकाराचा दुसरा विक्रम अवघ्या १ मिनिट १८ सेकंद १२ मायक्रो सेकंदात पूर्ण केला. यापूर्वीचा विक्रम बी. पवन साई यांच्या नावे १ मिनिट ५० सेकंदांचा होता. या विक्रमाला गौरवने पाठीमागे टाकले. अन्य दोन विक्रम गौरवने नव्याने स्थापन केले. यात त्याने दोनची दुप्पट चार व आठची दुप्पट सोळा, अशी तेहतीस अंकांपर्यंत दुप्पट करीत नवीन विश्वविक्रम केला. उल्लेखनीय म्हणजे संगणकावर ही प्रक्रिया फक्त ३२ अंकांपर्यंतच येते. त्याने अवघ्या ६ मिनिट ३७ सेकंद ७५ मायक्रो सेकंदात हा विक्रम नोंदविला. चौथा विक्रम होता कोणत्याही दोन अंकी संख्येचे कमीत कमी ९ पाढे बोलून दाखवायचे होते. अवघ्या ५७ सेकंद ३७ मायक्रो सेकंदात त्याने हा नवा विक्रम स्थापित केला. मात्र, त्यास ६० अंकी संख्येचे बेरीज डावीकडून उजवीकडे कोणतेही हाच्चे न घेता ६० सेकंदापूर्वी सोडवायचे होते. मात्र, तीन प्रयत्नात त्यास हा पाचवा विश्वविक्रम करता आला नाही. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. प्रवीण सोमय्या, पुरुषोत्तम शर्मा व आर.जी. दरख यांनी काम पाहिले. यावेळी गौरवचे वडील विजयकुमार भंडारी, अ‍ॅड. आर. डी. बाहेती आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विशाखा नांदगावकर यांनी केले. ‘सुपर ब्रेन’ला आबालवृद्धांचा सलाम गौरव भंडारी याने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम केल्याचे युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे मोहंमद परवेज यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, सांजवार्ताचे संपादक दिलीप चितलांगे व नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते गौरवला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी नाट्यगृहात जमलेल्या सर्व आबालवृद्धांनी उभे राहून गौरवच्या ‘सुपर ब्रेन’ला सलाम केला. भविष्यात स्वत:चे विक्रम मोडण्याची शुभेच्छागौरव भंडारीने विश्वविक्रम केल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, गौरवने आपल्या अफाट बुद्धिमत्तेने आज संगणकालाही हरविले. औरंगाबाद शहर अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे; पण आज गौरवने एकाच वेळी अंकगणितातील ४ विश्वविक्रम नोंदवीत जगात शहराला सन्मानित केले. आज आम्ही ताठमानेने जगाला सांगू शकतो की, जगातील सुपर ब्रेन पॉवर गौरव भंडारी हा आमच्या औरंगाबादेत, भवानीनगरातील ८ नंबर गल्लीत राहतो. भविष्यात स्वत:चे विक्रम मोडीत काढ व नवनवीन विक्रम स्थापित कर, अशा शुभेच्छा दर्डा यांनी दिल्या.