शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

चार बेवारस अखेर घाटीत

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरात बेवारस रुग्ण नरकयातना भोगत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्तानंतर दुसऱ्या दिवशी ‘बेवारस रुग्णांकडे घाटी प्रशासनाची पाठ’ या मथळ्याचे वृत्त लोकमतने दिले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालय परिसरात बेवारस रुग्ण नरकयातना भोगत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्तानंतर दुसऱ्या दिवशी ‘बेवारस रुग्णांकडे घाटी प्रशासनाची पाठ’ या मथळ्याचे वृत्त लोकमतने दिले. लोकमतने पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने मंगळवारी सकाळी चार रुग्णांना वॉर्ड क्रमांक १९ मध्ये भरती केले. यापैकी गँगरीन झालेल्या दोन रुग्णांवर तडकाफडकी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते अकील अहेमद हे औषधी, शस्त्रक्रियेचे साहित्य पुरविणार आहेत.गत सप्ताहात घाटी परिसरात बेवारस मृतदेहाला मुंग्या लागल्याची घटना उघडकीस आली होती. २ जानेवारी रोजी तेथे आणखी पाच रुग्ण नरकयातना भोगत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्तानंतर त्या रुग्णांना तातडीने उपचार मिळातील, अशी लोकमतला अपेक्षा होती. मात्र, कोणतीही हालचाल झाली नाही. ४ जानेवारी रोजी ‘त्या बेवारस रुग्णांकडे घाटीची पाठ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. छाया दिवाण यांनी अधीक्षक डॉ. सुहास जेवळीकर, उपअधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांना कार्यवाहीची सूचना केली. डॉ. जेवळीकर यांनी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नीलेश कोतकर, डॉ. राठोड, डॉ. चव्हाण यांना परिसरात थांबलेल्या रुग्णांचा आढावा घेण्यास सांगितले. ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे त्यांना तात्काळ दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी बाबूलाल शंकरलाल वगदे (रा. सिल्लोड), कैलास केशव कुलकर्णी, भारत सोमनाथ भोसले आणि संजय यशवंत राजपूत (रा. जालना) यांना वॉर्ड क्रमांक १९ मध्ये दाखल करण्यात आले. यापैकी दोन जणांना गँगरीन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.