शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात चार भाविक ठार

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

कडा: तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले़

कडा: तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कारला ट्रकने समोरासमोर जोराची धडक दिली़ या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले़ ही घटना कड्याजवळ शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता घडली़ मृतांत नाशिक जिल्ह्यातील वणी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांचा समावेश आहे़सुरेश वसंतराव थोरात (वय ३९), वणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच संजय यशवंत थोरात (वय ४५), शिवाजी केशव थोरात (वय ४२ तिघे रा़ वणीकसबे ता़ दिंडोरी जि़ नाशिक), साहेबराव रामचंद्र देशमुख (वय ४९ रा़ लखमापूर ता़ दिंडोरी जि़ नाशिक) अशी मृतांची नावे आहेत़ ते सर्व जण कार क्ऱ (एम़ एच़ १५ डीसी- ९४६१) मधून अहमदनगरहून बीडमार्गे तुळजापूरला दर्शनासाठी जात होते़ त्यांची कार कड्याजवळ आली तेव्हा अहमदनगरच्या दिशेने लाकडे घेऊन निघोलल्या ट्रक क्ऱ (एम़ एच़ ०४ एफयू- १२०५) ने समोरासमोर धडक दिली़ या अपघातात कारचा चक्काचूर झाला़ गंभीर मार लागून चौघेही जागीच गतप्राण झाले़ अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे़ कडा चौकी पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले़ रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले़ आष्टी ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहायक निरीक्षक शेख सलीम करत आहेत़वणी कसबेवर शोककळाअपघाताची माहिती कळाल्यावर वणी कसबे येथील ग्रामस्थ कड्यात दाखल झाले़ सुरेश थोरात, संजय थोरात व शिवाजी थोरात यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़ एकाच अपघातात तिघे जण गतप्राण झाल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे़ (वार्ताहर)अवैध लाकूड वाहतुकीच्या ट्रकने घेतले बळी !कडा परिसरातून रात्री-अपरात्री अवैध लाकूड वाहतूक केली जाते़ ज्या ट्रकने भाविकांच्या कारला उडविले़ त्याट्रकचालकाकडेही रितसर परवाना नव्हता अशी पोलीसांची माहिती आहे़ या ट्रकने चार भाविकांचा बळी घेतला़ अवैध लाकूड वाहतूक ही पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा होती़